Visarjan 2023 : ‘या’ कारणामुळे लालबागसह अनेक मोठ्या मूर्तींचे विसर्जन रखडले

302
Visarjan 2023 : 'या' कारणामुळे लालबागसह अनेक मोठ्या मूर्तींचे विसर्जन रखडले

गणेश चतुर्थी ते गणेश विसर्जन असा दहा दिवसाचा गणेशोत्सव (Visarjan 2023) सर्वांसाठी महत्वाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो. कालपासून म्हणजेच गुरुवार २८ सप्टेंबर पासून मुंबईच्या रस्त्यांवर ढोल ताशा आणि वाद्यांच्या गजरात नाचत गाजत बाप्पाचं विसर्जन होत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या डोळ्यात गणपती बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणताना पाणी येतं. लाखोंच्या संख्येने भाविक आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. तब्बल २० तास उलटून गेले असले तरी अजूनही लालबागसह अनेक मोठ्या गणपती मुर्तींचे विसर्जन (Visarjan 2023) रखडले आहे. गिरगाव चौपाटीवर पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

समुद्रात सध्या ओहोटी असल्याने गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनाच्या (Visarjan 2023) रांगेतच आहेत. अनेक मोठ्या मूर्तींचं विसर्जन अजूनही बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरतीनंतरच सर्व मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होतील.

(हेही वाचा – Mumbai Cha Raja Visarjan : मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीत शिवराय प्रकटले; नाचगाणे थांबवून गणेशभक्त शांत राहिले)

परळचा राजा, खेतवाडीचा राजा चौपाटीवर दाखल

सध्या गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून अनेक मोठे गणपती (Visarjan 2023) तिथे दाखल झाले आहेत. परळचा राजा, खेतवाडीचा राजा, भायखळ्याचा विघ्नहर्ता यासोबतच इतरही परिसरातील स्थानिक गणपती गिरगाव चौपाटी येथे विसर्जनासाठी दाखल झाले आहेत. या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर काही वेळाने लालबागचा राजा, चिंतामणी तसेच गणेश गल्लीचा राजा हे विसर्जनासाठी (Visarjan 2023) गिरगाव चौपाटीवर पोहचतील. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

New Project 2023 09 29T080420.831

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.