Vishalgad Fort : विशाळगडावर जाणार्‍यांच्या संदर्भात पूर्ण नोंदी ठेवाव्यात; विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीची मागणी

53
Vishalgad Fort : विशाळगडावर जाणार्‍यांच्या संदर्भात पूर्ण नोंदी ठेवाव्यात; विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीची मागणी
प्रशासनाने 5 जानेवारीपासून विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला आहे; मात्र काही धर्मीय आणि अन्य संघटनांच्या मागणीमुळे हा आदेश काढण्यात आला आहे का ? तरी गडावर जे पर्यटक जातात ते अन्य हेतूने जात नाहीत ना हे पहाण्यासाठी त्यांचे आधारकार्ड तपासण्यात यावे, त्यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात, गडावर गेलेले सर्व खाली येतात का ? हे तपासण्याची व्यवस्था करावी, यांसह प्रशासनाने अन्य उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. (Vishalgad Fort)
या प्रसंगी महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, शांतीदूत मर्दानी आखाडाचे सूरज केसकर आणि दत्ताजय जाधव, हिंदु महासभेचे मनोहर सोरप, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक प्रमोद सावंत, हिंदू एकता आंदोलन शहराध्यक्ष गजानन तोडकर, विश्‍व हिंदु परिषदेचे अनिल दिंडे, कैलास दीक्षित, शरद माळी, सुनील सामंत, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, आनंदराव पवळ यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Vishalgad Fort)
विशाळगडावर येणार्‍या पर्यटकांच्या नोंदी योग्य प्रकारे होण्यासाठी ‘सी.सी.टि.व्ही.’ बसवा !-राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना 
विशाळगडावरील अतिक्रमण, तसेच प्रशासनाने काढलेला आदेश या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. या प्रसंगी क्षीरसागर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना विशाळगडावर येणार्‍या पर्यटकांच्या नोंदी योग्य प्रकारे होण्यासाठी ‘सी.सी.टि.व्ही.’ बसवण्यात यावेत, उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी समयमर्यादा ठेवाव्यात यांसह अन्य सूचना केल्या. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे आणि महेंद्र अहिरे उपस्थित होते. (Vishalgad Fort)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.