Bharat हे हिंदू राष्ट्र होते, आहे आणि राहणार – मिलिंद परांडे

प्रत्येकाने मतदान करावं आणि Hindu हिताचा विचार करून मतदान करावं, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. 

496
Bharat हे हिंदू राष्ट्र होते, आहे आणि राहणार - मिलिंद परांडे
  • सुजित महामुलकर

“भारत हे हिंदू राष्ट्र होते, आहे आणि यापुढेही राहणार, त्यामुळे भारत हे हिंदुराष्ट्र व्हावं ही कल्पना राजकीय आहे,” असे ठाम मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केले. (Bharat)

परांडे यांनी हिंदू राष्ट्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न पुरस्कार तसेच विहीपचे कोणताही गाजावाजा न करता तळागळात सुरू असलेले समाजकार्य अशा विविध विषयांवर विहीपची स्पष्ट भूमिका मांडली. (Bharat)

हिंदूराष्ट्र व्हावं ही कल्पना राजकीय

भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार असतानाही अद्याप भारत हे हिंदुराष्ट्र म्हणून घोषित झाले नाही आणि ते व्हावं, अशी मागणी विविध संघटनांकडून वेळोवेळी होत असते.. यावर भाष्य करताना परांडे म्हणाले, “भारत हे हिंदूराष्ट्र होतं, आहे आणि यापुढेही हिंदुराष्ट्रच राहणार. जेव्हा मूघल आणि इंग्रज आपल्या देशावर राज्य करत होते, तेव्हाही हा देश हिंदुराष्ट्रच होता. त्यामुळे हिंदूराष्ट्र व्हावं, ही कल्पना राजकीय आहे आणि आम्ही या राजकीय कल्पनेला अजिबात मान्यता देत नाही. हिंदूराष्ट्र ही एक सांस्कृतिक, भू-सांस्कृतिक कल्पना आहे, भौगोलिक-राजकीय संकल्पना नाही. त्यामुळे भू-सांस्कृतिक आणि भू-राजकीय, यात खूप मोठं अंतर आहे.” (Bharat)

(हेही वाचा – Dinesh Bobhate : उबाठाचे खासदार अनिल देसाईंचे सचिव दिनेश बोभाटे अडचणीत; ईडीने बजावले समन्स)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबांकडून कधीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी मागणी करण्यात आली नाही आणि करणारही नाहीत. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी जनतेची इच्छा आहे की त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे. देशात हिंदुत्ववादी सरकार येऊन १० वर्षे झाली पण सावरकरप्रेमींची इच्छा अद्याप पूर्ण झाली नाही… यावर परांडे यांनी सांगितले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पहिले तैलचित्र लोकसभेत लागलं. या तैलचित्रालाही अनेकांनी विरोध केला होता पण तरी त्यांचे तैलचित्र लोकसभेत लागले, ही लहान नाही तर मोठी गोष्ट आहे. आणि त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे आणि मिळाला तर आनंदच होईल.” (Bharat)

सावरकर कुटुंबानेही कष्ट सोसले

“जसे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा बसविण्यात आला. हेदेखील सावरकर यांच्यासारखेच नेतृत्व होतं की ज्यांना स्वीकारायलाही कोणीही तयार नव्हतं. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याकरिता ज्यांनी संघर्ष केला, स्वतःचं बलिदान दिलं आणि प्रचंड कष्ट भोगले तेही एकट्याने नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भावांसह पूर्ण कुटुंबाने कष्ट सोसले आहे. याचं रिकाग्निशन वेगवेगळ्या पद्धतीने होत राहणार, भारतरत्न हे काही एकमेव माध्यम नाही. आणि संसदेत त्यांचे तैलचित्र लागले ही एक वेगळ्या प्रकारचे रिकाग्निशन आहे,” विहीपच्या एकात्मता स्तोत्रात रोज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण केले जाते असे त्यांनी स्पष्ट केले. (Bharat)

मुसलमानांच्या कचाट्यातून ८,००० मुलींची सोडवणूक

गेल्या काही वर्षात विहीप रस्त्यावर उतरलेला दिसत नाही जी संघटना पूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलने करत असे, यावर परांडे यांनी विहीपचे शांतपणे सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. “नुकतीच विहीपची ‘शौर्य जागरण’ यात्रा झाली. या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बजरंग दलच्या नावाने झाली. केवळ १० दिवसांत आम्ही जवळपास ९०,००० गावी गेलो, ७० लाखापेक्षा जास्त लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. हे तरूणांसोबतचे प्रचंड मोठे अभियान आहे. आज बजरंग दलात सोबत ३४ लाख युवक जोडले गेलेले आहेत. विश्व हिंदू परिषदेची आपण सदस्यता नोंदणी म्हणत नाही, तर हितचिंतक म्हणतो, अशी ७२ लाखाच्या वर नोंदणी झालेली आहे आणि ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. गेल्या वर्षभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मुसलमानांच्या कचाट्यात अडकलेल्या ८,००० पेक्षा जास्त मुलींची सोडवणूक केली आहे. हे काम करणारी दुसरी कोणतीही संघटना नाही.” (Bharat)

(हेही वाचा – Hurun Rich List 2024 : आशियातील अब्जाधीशांच्या यादीत चीनला मागे टाकत मुंबईची आगेकूच)

गोवंश वाचवले

“गेल्या वर्षभरात दोन लाख पेक्षा जास्त गोवंश कसायांच्या हातून वाचवले, हे काम कुठल्याच संघटनेने केलेले नाही. जे-जे ख्रिश्चन असो वा मुसलमान हे हिंदू धर्मात येण्यास तयार आहेत, अशा हजारो लोकांचं स्वागत विश्व हिंदू परिषद दरवर्षी करते. कोणतंही काम कमी न होता सगळी कामं वाढतंच चाललेली आहेत. गोवंश वाचवणं कसायांच्या हातून गोवंश रक्षण करणे कुठेही काम कमी झालेले नाही वाढतच गेली आहे आणि यात न्यूज व्हॅल्यू नाही आणि संवाद बिघडेल आज देशभरात आमच्या ९६ हजार कमिट्या आहेत आणि ३३ देशांमध्ये काम चालते,” अशी माहिती परांडे यांनी दिली. (Bharat)

हिंदू हिताचा विचार करून मतदान करावं

महाराष्ट्रात महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा आधिक जागा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए ४०० पार करील, असे वाटते का? या प्रश्नावर परांडे यांनी राजकीय उत्तर देणार नाही, असे स्पष्ट करत तरुणांना हिंदू हिताचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात हिंदू हिताचा जे विचार करतील, ते जिंकून आले पाहिजेत, असे आवाहन मी हिंदू समाजाला करतो आणि प्रत्येकाने मतदान करावं आणि हिंदू हिताचा विचार करून मतदान करावं. नवीन मतदारांना मी आग्रहपूर्वक आवाहन करतो की, त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून, कर्तव्य म्हणून हिंदू हिताचा विचार करणाऱ्यांना मतदान करावं, आणि याकरिता आम्ही प्रयत्न करू,” असे परांडे म्हणाले. (Bharat)

हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=OLRZy9RTlfM

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.