विश्व हिंदू परिषदेच्या (Vishva Hindu Parishad) कोकण प्रांताकडून पुरुषार्थ जागरणासाठी बजरंगदल शौर्य संचलन आयोजित करण्यात आले आहे. या वर्षी बजरंगदलाच्या (Bajrang Dal) वतीने कोकण प्रांतात एकूण चार ठिकाणी विशाल शौर्य यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गोवा, रायगड आणी सिंधुदुर्ग येथील शौर्य संचलन रविवार, ८ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले. मुंबई विभागाचे शौर्य संचलन दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता राजा बढे चौक शिवाजी पार्क येथे होईल. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी कमांडर भूषण देवन आणि प्रमुख वक्ते श्री स्वामी विज्ञानानंद असतील. तसेच या संचलनात दहा हजारांहून अधिक बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
बजरंग दलाचे शौर्य संचलन कशासाठी?
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येच्या जन्मभूमीवरील अपमानाचे चिन्ह असलेला बाबरी सांगाडा जमीनदोस्त झाला. शेकडो वर्षाच्या संघर्षा नंतर हिंदू (Hindu) समाजाचा पुरुषार्थ जागृत झाला, तो दिवस होता गीता जयंतीचा. त्या दिवसानंतर हिंदू (Hindu) समाजाने कात टाकली. देशाच्या सांस्कृतिक आणी राजकीय जीवनाच्या केंद्रस्थानी हिदुत्व विराजमान झाले. गीता जयंतीच्या दिवशीच योगेश्वर कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली आणी त्याच्यातील पुरुषार्थ जागृत केला होता. ३२ वर्षा पूर्वी गीता जयंतीच्या दिवशींचं हिंदू (Hindu) समाजाने पराक्रम केला आणी गुलामीचे चिन्ह जमीनदोस्त केले. त्या दिवसाची आठवण हिंदुस्तानातील अर्जुनरूपी युवकांना करून देण्यासाठी बजरंगदल दरवर्षी शौर्य दिवसाचे आयोजन करीत आले आहे. (Vishva Hindu Parishad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community