पुणे नेत्रतज्ञ संघटना, महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना (Vision Panorama 2024) व महा ऑप्टोमेट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हिजन पॅनोरमा २०२४’ परिषद बोट क्लब येथे पार पडली. या परिषदेत महाराष्ट्र आणि गुजरातसह ओमानमधील प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्थानिक व राष्ट्रीय स्तरावरील २२ तज्ञांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष अग्रवाल आणि खजिनदार डॉ. मंदार परांजपे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. ही परिषद पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या हिरक महोत्सवी उत्सवाची सुरुवात असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा डॉ राधिका परांजपे यांनी नमूद केले. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. राधिका परांजपे, सचिव डॉ. अश्विनी मिसाळ, खजिनदार डॉ. वृशाली वारद, वरिष्ठ नेत्रतज्ञ डॉ. सुवर्णा जोशी, बोमन भरुचा, निलेश थिटे, महादेव शेगुनाशी व इतर कार्यकारिणी सदस्यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
(हेही वाचा – शेतकरी महायुती सरकारला पावसाळी अधिवेशनात बाय बाय करणार; विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांची टीका )
परिषदेची संकल्पना डॉ. जीवन लाडी, डॉ. उदयन दीक्षित आणि डॉ. कुलदीप डोळे यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिक समितीने राबविली होती. प्राध्यापक डॉ. कुरेश मस्कती, आणि डॉ. सुनैना मलिक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. इतर उल्लेखनीय वक्त्यांमध्ये डॉ. मंजुश्री भाटे, दीपक बग्गा, यशवंत साओजी आणि किशोर कुमार भंडारी यांचा समावेश होता.
परिषदेच्या सुरळीत संचालनासाठी डॉ. अश्विनी मिसाळ आणि डॉ. वृषाली वारद यांच्या नेतृत्वाखालील पुणे आणि महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या सदस्यांनी तसेच डॉ. श्वेता मराठे, डॉ. आरती हेडा, डॉ. नितिका त्रिपाठी आणि डॉ. संध्या जमदग्नी ह्या कार्यकारिणी सदस्यांनी यांनी पाठिंबा दिला.
हेही पहा –