Visual Impairment: पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांमध्ये आढळतोय लघुदृष्टीदोष 

49

सध्या सोशल मीडिया ट्रेंड आणि मीम्सचे युग सुरू आहे. इथे प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट प्रासंगिक असेल तर ती इंटरनेटवर व्हायरल होते. ज्यामध्ये मुलाला डोकेदुखी, पाय दुखत असतात किंवा ताप येतो. या सर्व समस्यांवर पालक एकच टोमणा देतात – आणखी वापरा फोन. लहान मुलांमध्ये मोबाइलचा (Mobile Overuse) बेसुमार वापर, मैदानी खेळांमधील कमी रूची या विविध कारणांमुळे बहुतांश मुलांमध्ये लघुदृष्टीदोष (मायोपिया) निर्माण झाल्याने चष्मा लावावा लागत आहे. येत्या १० वर्षात यातली समस्या आणखी ४० टक्क्यांनी वाढण्याची भीती नेत्ररोग तज्ज्ञानी (Ophthalmologist) वर्तवली आहे. (Visual Impairment)

आशिया खंडात सिंगापूर, कोरिया आणि जपान या देशांत लघुदृष्टीदोष असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भारतात २०३० पर्यंत ४० टक्के मुलांना लघुदृष्टीदोष होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मोबाइलचा अतिवापर, खाण्यातील अनियमितता, मैदानी खेळांचा अभाव या कारणांमुळे या दोषाची लागण होत असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे.

निरोगी डोळ्यांसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. लहान मुलांचा मैदानी खेळांकडे कल कमी झाल्याने त्यांचा सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क येत नाही. परिणामी डोळ्याचा पडदा कमकुवत होतो. डोळ्याच्या पडद्याचा आकार साधारणपणे २४ मिमी इतका असतो. लघुदृष्टीदोष झाल्यास नजरेचा क्रमांक वाढतो. पण पडदा तितकाच असतो. त्यामुळे पडद्यावरील ताण वाढतो. ठरावीक पातळीनंतर तो फाटतो आणि कायमचे अंधत्व येते.

स्क्रीन टाइममुळे समस्या वाढत आहेत

कोरोना महामारीनंतर जसे निर्बंध शिथिल होऊ लागले, तसे सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. दरम्यान, प्रत्येकाच्या लक्षात आले की त्यांच्या स्क्रीन टाइममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या काळात मुले त्यांच्या अभ्यासासाठी स्क्रीनवर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी ही समस्या आणखी मोठी झाली. अभ्यासाव्यतिरिक्त तो स्क्रीनवर बराच वेळ घालवू लागला, जो आजतागायत सुरू आहे. आता त्याचे तोटे दिसू लागले आहेत.

(हेही वाचा – जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री निवडण्यासाठी BJP ला लागलाय वेळ, तेव्हा तेव्हा अनपेक्षित चेहऱ्यांची झालीय एंट्री)

भविष्यातील धोके

लहान मुलांमध्ये लघुदृष्टीदोष निर्माण झाल्यावर त्यांच्या चष्म्याचा क्रमांक हा ‘मायनस थ्री’ इतका असतो, मात्र, वाढत्या वयाप्रमाणे चष्म्याचा क्रमांक वाढून त्यांच्या डोळ्यांच्या पडद्याला इजा पोहोचून कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. तसेच ग्लुकोमा व मोतीबिंदूसारखे (Cataracts) नेत्रविकार (eye disease) होण्याची शक्यता आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.