Vitthal Rukmini Temple Committee: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आता दोन तासात होणार विठुरायाचं दर्शन!  

278

महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी हा अतुर असतो. आता वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीनं नुकतेच झालेल्या बैठकीत मोठा निर्णय (Vitthal Darshan Decision) घेतला आहे. त्यामुळे विठूरायाचं दर्शन अवघ्या दोन तासांत होणार आहे. (Vitthal Rukmini Temple Committee)

टोकन दर्शन पध्दत सुरु करण्याचा निर्णय

विठ्ठलाचे दर्शन (Vitthal Darshan tokan system) घेण्यासाठी भाविकांना- वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रांगेत उभा राहवे लागते, यामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागतो. हा वारकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी मंदिर समितीनं टोकन दर्शन पध्दत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – संविधान ही एका पक्षाची देणगी नाही; Rajnath Singh यांनी काँग्रेसला सुनावले खडेबोल)

फेब्रुवारीपासून होणार सुरवात 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची या संदर्भात नुकताच बैठक झाली. त्यामध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात साजरी होणाऱ्या माघ यात्रेपासून प्रयोगीक तत्त्वावर टोकण दर्शन‌ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयामुळे भाविकांना आता अवघ्या दोन तासात लाडक्या विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. दर्शन झाल्यानंतर भाविकांना लवकर पुढच्या देवस्थानावर किंवा माघारी फिरत येणार आहे. 

कंपनीकडून करण्यात आली पाहणी 

दरम्यान मंदिर समितीने घेतलेल्या या निर्णयानंतर हैदराबाद येथील टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेस या संस्थेच्या वतीने टोकण दर्शन व्यवस्थेसाठी लागणारे सॉफ्टवेअर मोफत देण्यात येणार आहे. या संस्थेच्या वतीने नुकताच येथील दर्शन बारीच सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था सुरु करण्यात काही अडचण होणार नाही.

(हेही वाचा – Hockey India League साठी दूरदर्शन अधिकृत प्रसारण भागीदार घोषित)

बालाजी, वैष्णो देवी मंदिरांच्या धर्तीवर टोकन पद्धत

ज्याप्रमाणे तिरुपती बालाजी, वैष्णो देवी या देवस्थानांवर टोकन पद्धत आहे. त्याच धर्तीवर आता पंढरपूर मध्ये ही टोकन पद्धत सुरु करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला आहे.  नव्या वर्षात म्हणजेच पुढील जानेवारी महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीनं दिली आहे.  

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.