Vitthal-Rukmini Temple: आषाढी यात्रेत ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन

150
Pandharpur: श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन 'या' तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या

आषाढी एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होत आहे. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन ७ ते २४ जुलैदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. यावेळी शेळके म्हणाले, येणाऱ्या भाविकांना सुलभ व तत्काळ दर्शन व्हावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.  (Vitthal-Rukmini Temple)

दर्शन रांग, पत्रा शेड, दर्शन मंडप येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी २ हजार कर्मचारी, स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यावेळी दर्शनरांग व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, यात्रेतील प्रथा व परंपरा, सुरक्षा व्यवस्था, दर्शन रांगेतील अन्नदान, वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल, स्वच्छता व्यवस्था, शासकीय महापूजा, लाइव्ह दर्शन व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, अपघात विमा पॉलिसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही व वायरलेस यंत्रणा, लाडू प्रसाद व्यवस्था, महिलांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष आदी व्यवस्थेचा आढावा घेऊन आषाढी यात्रेच्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती त्यांनी दिली. (Vitthal-Rukmini Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.