यंदा नोव्हेंबरपासून लग्नाचे मुहूर्त आहे. पुढील आठ महिन्यांत ५२ मुहूर्त आहेत. यातील तब्बल २१ मुहूर्त फक्त फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यांत आहेत. लग्न इच्छुकांच्या डोक्यावर यंदा नोव्हेंबरपासूनच अक्षता पडण्यास प्रारंभ होणार आहे. यावर्षी १८ नोव्हेंबरपासून लग्न सोहळ्यांच्या मुहूर्ताला प्रारंभ होत आहे. लग्न जुळलेल्यांच्या कुटुंबीयांनी आतापासून मंगल कार्यालये आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. (Vivah Muhurat)
(हेही वाचा – Assembly Election च्या काळात सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणा सजग, संशयास्पद प्रकरणी थेट जप्तीची कारवाई)
गतवर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा आहे. नोव्हेंबर ते जून या काळात लग्नासाठी एकूण ५२ शुभ मुहूर्त आहेत. त्या अनुषंगाने इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. वर-वधू मंडळीही लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. अनेक सामाजिक संस्था व मंडळांनी विवाह इच्छुक वर-वधूचे मेळावे आयोजित करून लग्नाच्या रेशीमगाठी बांधण्यात सहकार्याची भूमिका घेतली आहे. विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन पार पडत आहेत. नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात एकूण ५२ मुहूर्त आहेत. पैकी फेब्रुवारीमध्ये १०, मे महिन्यात ११ मिळून एकूण २१ असे मुहूर्त आहेत. सर्वांत कमी मुहूर्त डिसेंबर, मार्च व जून महिन्यात आहेत. मुहूर्त निवडून वधू-वरांच्या कुटुंबीयांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लग्नानंतर वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. (Vivah Muhurat)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त)
विवाह सोहळा हा दोन कुटुंबांतील महत्त्वाचा आनंद सैहळा असतो. यासाठी प्रशस्त मंगल कार्यालय, पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणांना अधिक पसंती दिली जाते. धावपळ टाळण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे. मे महिन्यातील मुहूर्ताला पसंती. मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे या दिवसातील मुहूर्त साधण्यात येतात. गेल्या मे महिन्यात नेमके मुहूर्त नव्हते. मात्र, यंदा नवीन वर्षात मे महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने सर्वाधिक लग्न मे महिन्यातच होण्याची शक्यता आहे. (Vivah Muhurat)
(हेही वाचा – Assembly Election : शेकापचा मविआला बाय बाय; रायगड जिल्ह्यासह सांगोल्यात होणार परिणाम; 5 उमेदवार केले जाहीर)
आठ महिन्यांतील विवाहयोग्य मुहूर्त
नोव्हेंबर – १८, २२, २५, २७.
डिसेंबर – १, २, ५, ६, ११.
जानेवारी – १६, १९, २०, २३, २४, २९, ३०.
फेब्रुवारी – २, ३, ७, १६, १९, २०, २१, २३, २६.
मार्च – २, ३, ६, ७.
एप्रिल – १६, १८, २०, २१, २३, २५, ३०.
मे – १, ७, ८, ९, ११, १८, १९, २२, २३, २५, २८.
जून – १, २, ३, ४.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community