ठाणे शहर पोलिस आयुक्त फणसळकर यांना बढती!

विवेक फणसळकर ३१ जुलै २०१८ रोजी ठाण्याच्या पोलिस आयुक्त पदी विराजमान झाले होते.

ठाणे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बढती मिळाली आहे. त्याच्या पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त भार सुरेशकुमार मेखाल यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपविण्यात आला आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी फणसळकरांची केलेली स्तुती

फणसळकर यांची ३१ जुलै २०१८ रोजी ठाण्याचे पोलिस आयुक्त पदी विराजमान झाले होते. दरम्यान आपल्या निवडणुकीत जवळपास ९० टक्के पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अशाप्रकारे फणसळकर यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी आणि कोरोना काळात त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी वर्गाने चांगल्या तऱ्हेने हाताळलेली ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाची परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. गुन्हेगारीवर नियंत्रणाबरोबरच राज्याबाहेर जाणाऱ्या मजुरांना पोलिसांनी दिलेला मदतीचा हात, रक्तदानाचे कार्य आणि कोरोनामुळे शहीद झालेल्या कुटूुबियांच्या पाल्यांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेण्याच्या त्यांच्या उपक्रमाची राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलिस महासंचालकांनीही मुक्त कंठाने स्तुती केली होती.

(हेही वाचा : मालाडला सहाय्यक आयुक्त द्या, नाहीतर कोर्टात जाऊ!)

अध्यादेश काढण्यात आला!

फणसळकर यांच्यासह विशेष कृती अभियानचे अपर पोलिस महासंचालक के. वेंकटेशम यांची राज्याच्या नागरी संरक्षण संचालक पदी, तर राज्याचे लोहमार्ग अपर पोलिस महासंचालक संदीप बिश्रोई यांची न्यायिक तांत्रिक महासंचालक पदी बढती मिळाली आहे. याबाबत तसा अध्यादेश ४ मे रोजी काढण्यात आला असून त्या अध्यादेशावर उपसचिव कैलास गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here