Action by ED: विवो आणि लाव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ईडीकडून अटक

एका चिनी नागरिकाचा समावेश आहे.

219
Action by ED: विवो आणि लाव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ईडीकडून अटक
Action by ED: विवो आणि लाव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ईडीकडून अटक

विवो (Vivo) या चिनी कंपनीची भारतात विवो इंडिया ही कंपनी असून तिच्या विरोधात मनी लॉंडरिंग प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात ईडीने चार जणांना अटक (Action by ED) केली. यामध्ये एका चिनी नागरिकाचा समावेश आहे. लाव्हा इंटरनॅशनल या मोबाईल कंपनीचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर हिर ओम राय यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात हरि ओम राय यांचा या प्रकरणात नेमका कसा सहभाग आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. गेल्या वर्षी मनी लॉंडरिंगप्रकरणी ३ फेब्रुवारीला PMLA कायद्यांतर्गत ईडीने या कंपन्यांवर छापेमारी सुरू केली होती. त्यावेळी व्हिवोसोबत इतर २३ कंपन्यांवरही ईडीची धाड पडली होती. व्हिवोने भारतात कमवलेल्या पैशांपैकी अर्धी रक्कम, म्हणजेच तब्बल १.२५ लाख कोटी रुपये चीनला पाठवल्याचा आरोप त्यावेळी ईडीने केला होता.

(हेही पहा – Dhananjay Munde : पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास शासन निर्णय निर्गमित )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.