New Jobs In Telecom Company :व्होडाफोन, एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये एका वर्षात २५,००० नवीन नोकऱ्या

कोरोनाच्या आधीची दूरसंचार कंपन्यांमध्ये असलेली मरगळ आता झटकायला सुरुवात केली आहे.

171
Jobs News : मराठी तरुणांना आता मिळणार जर्मनीत नोकरी

देशात ५जी सेवा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हो़डाफोन – आयडिया या पहिल्या तीन दूरसंचार कंपन्यांमध्ये New Jobs In Telecom Company येत्या वर्षभरात २५ टक्के नोकरभरती वाढणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याविषयीची माहिती दिली आहे.

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने अलीकडेच देशभरात २६ गिगा हर्ट्झ मिलिमीटर लहरींच्या माध्यमातून ५-जी सेवा सुरू करण्याची तयारी चालवली आहे. आणि या नेटवर्कमधून २ गिगाबाईट हा सर्वाधिक वेग साध्य केल्याचा दावाही कंपनीने केला आहे. रिलायन्सच्या प्रसिद्धीपत्रकात जिओचे ग्राहक सध्या २२ दूरसंचार वर्तुळात २६ गिगाहर्ट्‌झ नेटवर्क वापरत असल्याचं म्हटलं आहे. ५-जी सेवांसाठीचं स्पेक्ट्रम ॲलोकेशन ऑगस्ट २०२२ मध्ये पार पडलं होतं. त्याप्रमाणे रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्यांनी नेटवर्क सुरू करण्याची तयारी चालवली आहे. तर एअरटेल आणि व्होडाफोन – आयडिया यांनीही भांडवलाची जुळवाजुळव केली आहे. व्होडाफोन कंपनीनेही एका प्रायोजक कंपनीकडून ५-जी जोडणीसाठी २,००० कोटी रुपयांचं कर्ज मिळवलं आहे. ३० जून २०२३ पर्यंत कंपनीवर २.११ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. तरीही ५-जी ही दूरसंचार कंपन्यांसाठी नवीन संधी आहे. आणि ती साधण्यासाठी कंपन्या पुढे सरसावल्यात. कोरोनाच्या आधीची दूरसंचार कंपन्यांमध्ये असलेली मरगळ आता झटकायला सुरुवात केली आहे.

(हेही वाचा : Retail Food Inflation : देशात किरकोळ महागाई दर इतका का वाढला ?)

सहा महिन्यात नोकर भरती ३० टक्क्यांनी वाढली
कोरोना नंतरच्या काळात आधीच दूरसंचार कंपन्यांमधील नोकर भरती वाढली आहे. मागच्या सहा महिन्यात नोकर भरती ३० टक्क्यांनी वाढली आहे.ही नोकर भरती व्हाईटस्पेस स्पेक्ट्रम, ५-जी, व्हर्चुअल नेटवर्क्स ऑपरेशन्स, नेटवर्क सुरक्षा, डेटा सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि क्लाऊड या क्षेत्रातील तज्जांची गरज देशाला लागणार आहे. त्यासाठी दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यातून या वर्षभरात या क्षेत्रात २५,००० नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.