महिलांसाठी खुशखबर! ‘या’ रेल्वे स्थानकात पहिलं ‘पावडर रूम लाउंज’

121

मुंबई मेट्रो वनतर्फे घाटकोपर रेल्वे स्थानकात खास महिलांसाठी देशातील पहिले ‘वोलू पावडर रुम लाउंज’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या पावडर रुम लाउंजचे रविवारी रेल्वे आयुक्त कैसर खलिद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. हे १ हजार चौरस फुटांचे लाउंज आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्र पुन्हा गारठणार ! )

या लाउंजमधील सुविधा

या लाउंजमध्ये अनेक अत्याधुनिक सेवांचा समावेश आहे.  अनेकवेळा महिलांची रेल्वे स्थानकात सुविधेअभावी गैरसोय होते. परंतु या ‘वोलू पावडर रुम लाउंज’ मुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे.

– वाय-फाय सुविधा
– वातानुकूलित यंत्रणा
– ८ स्मार्ट स्वच्छतागृहे 
– सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर
– लहान मुलांचे डायपर बदलण्याची सोय
– सुरक्षेच्या दृष्टीने चेहराओळख -सॉफ्टवेअरयुक्त सुरक्षितता
– १४ आसनी कॅफे

( हेही वाचा : फेब्रुवारी महिन्यात ७ दिवस बँका बंद, पहा संपूर्ण वेळापत्रक )

या वरील सर्व सुविधांचा या लाउंजमध्ये समावेश असेल अशी माहिती मेट्रो वन प्रशासनाने दिली आहे.

स्वच्छतागृहांची माहिती शोधण्यासाठी उपयोग

मुंबई रेल्वे पोलिस दलातील महिलांना आयएपीएमओ आणि आयडब्ल्यूएसएचतर्फे ओलू पावडर रूम आणि ओलू ॲप देण्यात आले. यामुळे महिलांना मुंबईतील स्वच्छ व जवळची स्वच्छतागृहे शोधण्यासाठी या ॲपचा उपयोग होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.