अरे व्वा! आता घरबसल्या करु शकता मतदान!

अपंग व्यक्ती, जेष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिकांसाठी ई-वोटींगची सुविधा तयार करण्यात आली आहे.

तेलंगणा सरकारने बुधवारी, 6 ऑक्टोबर रोजी देशातील पहिली स्मार्टफोन आधारित ई-मतदान यंत्रणा सुरु केली आहे. या यंत्रणेची चाचणी करण्यासाठी खक्कम जिल्ह्यात डमी निवडणूकही घेण्यात आल्या. मतदार 8 ते 18 ऑक्टोबर दरम्यान स्मार्टफोन आधारित अर्जावर आपली नोंदणी करू शकतात. 20 ऑक्टोबर रोजी हे डमी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नोंदणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वेबसाईट खुल्या केल्या आहेत.

तज्ज्ञ समितीचे मार्गदर्शन

तेलंगणा राज्य निवडणूक आयोग (टीएसईसी) राज्य सरकारच्या आयटी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (आयटीई आणि सी) विभागाच्या तंत्रज्ञान शाखेच्या सहाय्याने आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सीडीएसी) च्या सहाय्याने ही प्रणाली लागू केली आहे. प्राध्यापक रजत मुना, आयआयटी भिलाईचे संचालक आणि ईसीआयचे तांत्रिक सल्लागार आणि आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक यांचा समावेश असलेल्या तज्ञ समितीने तांत्रिक बाबींमध्ये मार्गदर्शन केले आहे.

(हेही वाचा : नवाब मलिकांना सनसनाटी निर्माण करून कुणाला वाचवायचे?)

या लोकांसाठी ई- व्होटिंग सुविधा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ब्लॉकचेन ही दोन बहुमुखी तंत्रज्ञान आहेत, जी आधीच आमच्या विविध सरकारी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना जोडलेले आहेत. त्यामुळे सरकारी प्रकल्प सशक्त झाले आहेत. आपल्या राज्यातील नागरिकांसाठी आणि विशेषत: ज्यांना कोविडमुळे किंवा अन्य शारीरिक व्याधींमुळे मतदान करण्यासाठी घराबाहेर जाता येत नाही. त्यांच्यासाठी ई-व्होटिंगच्या रुपात एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. अशा तंत्रज्ञानामध्ये निवडणूक आयोगाचे समर्थन आणि आत्मविश्वास हा भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे. असे तेलंगणा सरकारचे प्रधान सचिव जयेश रंजन म्हणाले.

‘ई-मतदान’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार

अपंग व्यक्ती, जेष्ठ नागरिक, तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी ई-वोटींगची सुविधा आहेच, पण सोबतच काही ठराविक क्षेत्रात काम करणा-या लोकांसाठीसुद्धा तयार करण्यात आली आहे. त्यात अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत नागरिक, मतदान क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि आयटी व्यावसायिक अशा मतदारांच्या विशिष्ट विभागाला ‘ई-मतदान’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या योजनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here