पुढल्या महिन्यात होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देशभक्त नागरिकांचे पहिले प्राधान्य डेमोक्रॅटिक पक्ष असेल. डोनाल्ड ट्रम्प एक अस्थिर व्यक्ती असून ते जर दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले, तर लोकशाही मूल्य नष्ट होतील. त्यामुळे अमेरिकेला या इशाऱ्याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार अमेरिकेच्या (America) उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी दिला आहे. त्या वॉशिंग्टन येथे आयोजित प्रसारसभेला संबोधित करत होत्या.
हेही वाचा – Salman Khan : सलमान खानला पुन्हा धमकी! थेट मुंबई पोलिसांना मेसेज करुन केली ‘ही’ मोठी मागणी
या कार्यक्रमाला रिपब्लिक पक्षाचे १०० हून माजी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांना व मतदारांना देशाला प्रथमस्थानी ठेवण्याचे आवाहन केले.
कमला हॅरिस (Kamala Harris) पुढे म्हणाल्या की, मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतेमी भावी पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ बायडेन व प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कार्यकाळपेक्षा वेगळा असेल, असा दावा हॅरिस यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community