Votebank चे राजकारण हे अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाशी संबंधित; NCERTच्या अभ्यासक्रमात भारतीय राजकारणाचे वस्तूस्थितीदर्शक वर्णन

भारतात राजकीय पक्षांनी बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी निवडणुकीतील फायद्यांसाठी भावनिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. असं करत असतांना त्यांनी समाजाला भेडसावणाऱ्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं आहे, असे अभ्यासक्रमात म्हटले आहे.

138
Votebank चे राजकारण हे अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाशी संबंधित; NCERTच्या अभ्यासक्रमात भारतीय राजकारणाचे वस्तूस्थितीदर्शक वर्णन
Votebank चे राजकारण हे अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाशी संबंधित; NCERTच्या अभ्यासक्रमात भारतीय राजकारणाचे वस्तूस्थितीदर्शक वर्णन

भारतातील व्होट बँकेचं (Votebank) राजकारण हे अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाशी संबंधित आहे आणि याचा अर्थ सर्व राजकीय पक्ष नागरिकांच्या समानतेकडे दुर्लक्ष करत केवळ अल्पसंख्याकांच्या हिताला प्राधान्य देतात, असे स्वातंत्र्यानंतर काँग्रेससह सर्वपक्षियांनी केलेल्या राजकारणाचे वस्तूस्थितीदर्शक वर्णन एनसीआरटीच्या (NCERT) अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. एनसीईआरटीच्या ११ वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात ‘व्होट बँकेचं राजकारण’ (मतपेढीचं राजकारण, Vote bank Politics) या अंतर्गत हा मजकूर प्रकाशित करण्यत आला आहे.

(हेही वाचा – Kanchanjunga Express Accident : बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात; 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू)

खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष

या धड्यात पुढे म्हटलं आहे की, “भारतात राजकीय पक्षांनी बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी निवडणुकीतील फायद्यांसाठी भावनिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. असं करत असतांना त्यांनी समाजाला भेडसावणाऱ्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. याचाच अर्थ राजकीय पक्ष नागरिकांच्या समानतेच्या तत्त्वांचा अवमान करतात आणि अल्पसंख्याकांच्या गटाला, त्यांच्या हिताला प्राधान्य देतात. मात्र असं करत असताना अल्पसंख्यांचा गट अलिप्त राहतो. तसेच अल्पसंख्याक गटातील विविधतेकडे दुर्लक्ष होते, त्यांच्या समाजिक सुधारणांचा मुद्दा मागे राहतो.”

धर्मनिरपेक्ष राजकारण्यांमुळे बहुसंख्य लोकांचं हित धोक्यात आलं तर काय ?

एनसीईआरटीच्या (NCERT) पाठ्यपुस्तकात भारतातील बेगडी धर्मनिरपक्षतेविषयी परखड भाष्य करण्यात आले आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन्ही वर्षांच्या पाठ्यपुस्तकांमधील धड्यांमध्ये म्हटलं आहे की “धर्मनिरपेक्ष राजकारणी अल्पसंख्याकांची मतं मिळावी, यासाठी त्यांना हवं ते देऊ शकतात. हे धर्मनिरपेक्ष प्रकल्पाचं यश आहे. अल्पसंख्यांकांच्या हितांचं रक्षण करणं हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र धर्मनिरपेक्ष राजकारण्यांमुळे (Secularism In Politics) बहुसंख्य लोकांचं हित धोक्यात आलं तर काय ? असा प्रश्न निर्माण होतो. व्होट बँकेच्या राजकारणात काही चुकीचं असू शकत नाही. परंतु, या व्होट बँकेच्या राजकारणामुळे एखाद्या गटाला किंवा समाजाला निवडणुकीच्या काळात विशिष्ट उमेदवार दिला जात असेल किंवा एखादा समाज/गट एका राजकीय पक्षासाठी एकत्र केला जात असेल, तेव्हा निवडणुकांचं राजकारण विकृत बनतं. तुम्ही अशा उदाहरणांचा विचार करू शकता का ? अशा प्रकारच्या राजकारणात मतदानावेळी एक संपूर्ण गट एकत्र येऊन काम करतो. त्यांच्यात विविधता असली, तरी ते ठराविक व्यक्ती अथवा पक्षाला मतदान करतात. त्या वेळी व्होट बँकेचं राजकारण करणारे पक्ष किंवा नेते त्या एका गटाचाच विचार करतात. किंवा ‘आम्ही त्या एका गटासाठी काम करण्याचा प्रयत्न करू’ असा विश्वास त्या गटामधील लोकांमध्ये निर्माण करतात.”

काँग्रेससह सर्वपक्षियांनी देशावर अनेक वर्षे अशाच प्रकारची तथाकथित धर्मनिरपेक्षता लादली. मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे राजकारण (Votebank) केले. बहुसंख्य असलेल्या हिंदूंना नेहमीच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केल्या गेलेल्या दांभिकतेचा फटका बसला. आता हे वस्तुस्थितीदर्शक लिखाण अभ्यासक्रमात आल्यावर मात्र काँग्रेसवाल्यांनी आणि धर्मनिरपेक्षतावाल्यांनी थयथयाट चालू केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.