By-Election Voting : नगरपरिषद व नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्टला मतदान

124
By-Election Voting : नगरपरिषद व नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्टला मतदान

विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेतील एकूण ११ सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी आणि हातकणंगले (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. (By-Election Voting)

खालापूर, पाली (जि. रायगड), निफाड, सुरगाणा (जि. नाशिक), बोदवड (जि. जळगाव), धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार), कवठेमहांकाळ, खानापूर (जि. सांगली), चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभुळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठीदेखील मतदान होणार आहे. (By-Election Voting)

(हेही वाचा – Legislative Council Elections : अजित पवारांकडून शरद पवारांना धक्का; विधान परिषद निवडणुकीत शरद पवार पुरस्कृत उमेदवार पाडला)

नामनिर्देशनपत्रे १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. २५ जुलै २०२४ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. १२ ऑगस्ट २०२४ रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. (By-Election Voting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.