Wagh Bakri Scion Dies : वाघबकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा अपघाती मृत्यू 

वाघबकरी चहा जगभरात पोहोचवणारे गुजरात टी प्रोसेसर्स कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा ४९ व्या वर्षी मृत्यू झाला आहे

108
Wagh Bakri Scion Dies : वाघबकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा अपघाती मृत्यू 
Wagh Bakri Scion Dies : वाघबकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा अपघाती मृत्यू 

ऋजुता लुकतुके

वाघबकरी हा चहाचा ब्रँड जगभरात पोहोचवणारे गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स या कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Wagh Bakri Scion Dies) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सात दिवसांपूर्वी गुजरातमध्येच त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला होता. आणि यात त्यांच्या डोक्याला मार बसला होता.

सात दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. पण, अखेर डोक्यात रक्तस्त्राव होऊन त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. पराग यांनी अमेरिकेत लाँग आयलंड विद्यापीठातून पीएचडी केलं होतं. आणि त्यानंतर घरच्या उद्योगात त्यांनी मोठे बदल केले. वाघबकरी या चहाच्या ब्रँडचं पॅकेजिंग त्यांनी बदललं.

(हेही वाचा-IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जेव्हा प्रेक्षक महम्मद शामीच्या नावाचा गजर करतात…)

चहाच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे ते प्रमुख होते. स्वत: चहाचे दर्दी असलेले पराग चहा बाजारपेठेत व्यावसायिक चहा आस्वादक आणि इव्हॅल्युएटर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कंपनीबरोबरच्या कार्यकाळात त्यांनी बाघबकरी चहाची गुणवत्ता वाढवली. चहा निर्यातयोग्य बनवला. आणि वाघबकरी चहा भारताबाहेर युरोपीयन आणि अमेरिकन बाजारपेठांमध्ये पोहोचवला.

या शिवाय वाघबकरी चहा लाऊंज आणि रिटेल विक्री सुरू करण्यातही त्यांचाच हातभार होता. (Wagh Bakri Scion Dies) चहाच्या ब्रँडची ऑनलाईन विक्री करण्याचा प्रयत्नही त्यांनी यशस्वी करून दाखवला. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजमध्येही ते सक्रिय होते.

गुजरातमध्ये प्रवास करताना १५ ऑक्टोबरला त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यात पराग देसाई गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांचा जीव यात वाचू शकला नाही.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.