Wagh Nakh Satara : वाघनखे म्हणजे महाराष्ट्राची शान; मुख्यमंत्री शिंदेंनी केला शिवरायांचा गौरव

Wagh Nakh Satara : छत्रपती शिवरायांची 'वाघनखं' १९ जुलैपासून साताऱ्यात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखे महाराष्ट्रात पोहोचली आहेत. या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांचे देखील प्रदर्शन सातारा येथे भरवण्यात आले आहे.

211
Wagh Nakh Satara : वाघनखे म्हणजे महाराष्ट्राची शान; मुख्यमंत्री शिंदेंनी केला शिवरायांचा गौरव
Wagh Nakh Satara : वाघनखे म्हणजे महाराष्ट्राची शान; मुख्यमंत्री शिंदेंनी केला शिवरायांचा गौरव

सातारा येथे फक्त वाघनखांचं दर्शन होणार नसून शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं दर्शन होणार आहे. आज आम्ही येथे केवळ छत्रपतींचे मावळे म्हणून या सातारानगरीत आलो आहोत. सुधीर मुनगंटीवारांनी लंडनमध्ये जाऊन याचा एमओयू करून ही वाघनखे सातारानगरीत आणली. शिवरायांची ही वाघनखे राज्यात आणल्याने सर्वांमध्ये स्फुर्ती आली पाहिजे. परंतु काही लोकांना या अशा घटनांना गालबोट लावायचं, राजकारण करायचं असतं. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, वीरतेचा, पराक्रमाचा, शूरतेचा अपमान केल्यासारखे आहे. हा अपमान शिवप्रेमी कदापीही सहन करणार नाही, असे उद्गार एकनाथ शिंदे यांनी या वेळी काढले. सातारा येथील वाघनखांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

(हेही वाचा – Microsoft Global Outage : हा सायबर हल्ला नाही, समस्या आहे; CrowdStrike च्या अध्यक्षांची माहिती)

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती. या वेळी सोहळ्याला येताच मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवरायांना अभिवादन केले. तसेच तिथे उपस्थित महिलांनी या तिघांना राखी बांधली. या वेळी शिंदे, फडणवीस, पवारांच्या हस्ते वाघनखांसह इतर शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. शिवकालीन वाघनखांची पहिली झलक या वेळी समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, 10 नोव्हेंबर 1659 चा तो दिवस होता. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. हिंदवी स्वराज्य स्थापनेतील ही सर्वात मोठी घटना होती. आज या पराक्रमाचा एक एक घटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भारतीय नौदलाच्या ध्वजावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही निशाणी दिल्याचा उल्लेखही शिंदे यांनी केला.

अनेक जण लंडनमध्ये कोहिनुर हिरा पाहतात फोटो टाकतात – अजित पवार

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. काही चांगले होत असेल, तर काही जण त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. टीका करणाऱ्यांपैकी अनेक जण लंडनमध्ये कोहिनुर हिरा पाहतात फोटो काढून टाकतात. मात्र आज महाराष्ट्रात मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही वाघनखे आणण्यात आली आहेत, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.