संतोष देशमुख हत्या प्रकरणात Walmik Karad च मास्टमाईंड

63
संतोष देशमुख हत्या प्रकरणात Walmik Karad च मास्टमाईंड
संतोष देशमुख हत्या प्रकरणात Walmik Karad च मास्टमाईंड

सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड (Walmik Karad ) हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर येत आहे. अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीतून झालेल्या वादानंतर ही हत्या करण्यात आली, असा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला दोन महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटला असला तरी हत्येच्या कटातील आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. आरोप पत्रात फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा नंबर आठव्या क्रमांकावर आहे.

( हेही वाचा : AI निर्मित प्रेयसीने प्रियकराला कसा घातला २४ लाखांचा गंडा?)

दि. २६ फेब्रुवारी रोजी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना नियुक्त केले. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात सीआयडी बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मिक कराडसह आठ आरोपींच्या विरोधात एक आरोप पत्र दाखल झाले. हे साधारण १४०० पानांचे आरोपपत्र असून खंडणीसह अपहरणाच्या प्रकरणात मोठे उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. आरोपींना फरार करण्यास मदत करणारे डॉ. संभाजी वायबसे (Dr. Sambhaji Vaibse) दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली.

पोलिसांनी सादर केलेल्या आरोप पत्रात पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार हा वाल्मिक कराड आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विष्णू चाटे, तिसऱ्या क्रमांकावर सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि त्या खालोखाल प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे यांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींची क्रमवारी ही त्यांच्या कृत्यानुसार ठरवण्यात आली आहे. यातील प्रमुख आरोपी हा सुदर्शन घुले असून त्यानेच सरपंच देशमुख यांना जबर मारहाण केल्याचे यात उल्लेख करण्यात आला आहे. असेच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना घेऊन जाणारा व्यक्तीही सुदर्शन घुले होता.

खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख 

२९ नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने (Walmik Karad) खंडणी मागितली होती. त्यानंतर सहा डिसेबरला देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला आणि मारहाण झाली. या महाराणीच्या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. त्यानंतर ९ तारखेला देशमुख यांची हत्या झाली होती. या तिन्ही प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते एकत्रित असून त्यांनी हा कट कुठे रचला, याची संपूर्ण माहिती पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागली आहे. याशिवाय देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सीआयडीकडे उपलब्ध आहे. खंडणी मागितली आणि ती न दिल्यामुळे देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे जवळजवळ उघड असल्याने ८० दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. स्कॉर्पिओत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते. पोलिसांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते. या घटनेचा ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. घटना घडल्यानंतर देशमुख (Santosh Deshmukh) यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्यात यावी.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.