मोदी सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करून ते लागू केले आहे. मात्र दुसरीकडे कट्टरपंथी आणि विरोध पक्षाचे नेते अजूनही वक्फ विधेयकाला (Waqf Amendment Bill ) विरोध करत आहेत. दरम्यान, अहमदाबादमधील (Ahmedabad) राखियालमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम जमाव रस्त्यावर उतरला. त्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वीच जमावाला ताब्यात घेण्यात आले.
(हेही वाचा : ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाला गती द्या; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश)
सोशल मीडिया साइट X वर सागर पटोलिया या वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, अहमदाबादमधील (Ahmedabad) राखियाल येथील कलंदरी मशिदीजवळील रस्ता अडवून मुस्लिमांनी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, मुस्लिम जमावाने सुरुवातीला मुख्य रस्ता पूर्णपणे रोखला आणि नंतर रस्त्यावर नमाज अदा करण्यास सुरुवात केली.
वक्फ कायद्याच्या (Waqf Amendment Bill ) विरोधात येथे गर्दी जमली होती आणि दि. ११ एप्रिल रोजी नमाजानंतर हे आंदोलन करण्याचे नियोजन होते. पण अहमदाबाद पोलिसांनी वेळीच परिस्थितीचा आढावा घेतला आणि परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून सुरुवातीलाच सर्वांना ताब्यात घेतले.
अटकेच्या काळातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुस्लिम (Muslim) कट्टरपंथी वारंवार फेक नॅरेटिव्ह पसरवून मुस्लिमांना भडकवताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विधानांचा हवाला देत ते म्हणाले की, हे लोक मुस्लिमांच्या मशिदी आणि कब्रस्तान हिसकावून घेतील. व्हिडिओमध्येमुस्लिम व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते की, “हे मोदी आणि अमित शाह कोण आहेत? हा त्यांच्या बापाचा देश आहे का? ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही.” सध्या अहमदाबाद पोलिसांनी दंगलखोरांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. (Waqf Amendment Bill )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community