वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill) मुस्लिमांचा एक मोठा वर्ग पाठिंबा देत आहे. अजमेर दर्ग्याच्या प्रमुखांनी म्हटले आहे की, वक्फ विधेयकातील दुरुस्तीमुळे पारदर्शकता येईल. मुस्लिमांव्यतिरिक्त, ख्रिश्चनांच्या एका संघटनेचाही याला पाठिंबा मिळाला आहे. या संदर्भात ख्रिश्चन संघटनेने केरळच्या खासदारांना पत्र लिहिले आहे. अखिल भारतीय सूफी सज्जादानशीन काऊंसिलचे अध्यक्ष आणि अजमेर दर्ग्याचे (Ajmer Dargah) प्रमुख सय्यद नसीरुद्दीन चिश्ती (Syed Naseruddin Chishty) यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. दि. ३१ मार्च रोजी ईदच्या (Eid) निमित्ताने त्यांनी वक्फ विधेयकात सुधारणा करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
चिश्ती म्हणाले, “एखाद्या विधेयकाचा (Waqf Amendment Bill) विरोध करणे आणि पाठिंब देणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. माझ्या मते, वक्फमध्ये बदलाची गरज आहे. वक्फ कायद्यामुळे मशिदी आणि कब्रस्तान हिसकावून घेतल्या जातील, असे म्हणणे चुकीचे आहे. पूर्ण विचाराअंतीच सरकार हे विधेयक आणत आहे. या जेपीसीने सर्वांचे म्हणणे ऐकले आहे. आणि हे विधेयक संसदेत सादर केले जाईल. मला खात्री आहे की हे विधेयक आल्यानंतर वक्फ प्रकरणात पारदर्शकता येईल. यामुळे वक्फ मालमत्तांचे भाडे वाढेल, जे मुस्लिम समाजासाठी उपयुक्त ठरेल.”
(हेही वाचा – Mamata Banerjee यांचे सनातन हिंदू धर्मांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाल्या, ‘घाणेरडा धर्म म्हणून…’)
नसीरुद्दीन चिश्ती म्हणाले की, वक्फबाबत लोकांची दिशाभूल केली जात आहे. सरकार वक्फच्या बाबतीत हस्तक्षेप करत नाहीये तर त्याचे व्यवस्थापन मजबूत करत आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींनी ईदला मुस्लिम बांधवांना दिलेल्या ‘सौगात ए मोदी’ या भेटवस्तुबाबतही आभार मानले. (Waqf Amendment Bill)
केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिल (KCBC) सोबत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती (Syed Naseruddin Chishty) यांनी केरळमधील खासदारांना हे विधेयक संसदेत चर्चेसाठी सादर केले जाईल तेव्हा त्याच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली आहे. केसीबीसीने २९ मार्च २०२५ रोजी याबाबत एक प्रेस रिलीज जारी केला आहे. या प्रेस रिलीजमध्ये , KCBC अध्यक्ष कार्डिनल क्लेमिस कॅथोलिक बावा, उपाध्यक्ष बिशप पॉली कन्नुक्कट्टन आणि सरचिटणीस बिशप ॲलेक्स वडाक्कुमातला यांनी केरळच्या खासदारांना वक्फ कायद्याच्या ‘आक्षेपार्ह’ भागांच्या दुरुस्तीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यात मुनंबन जमिनीवरील वक्फबाबत सुरू असलेल्या वादाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच केरळ वक्फ बोर्डाने एर्नाकुलम जिल्ह्यातील मुनंबममधील सुमारे ४०४ एकर जमिनीवर दावा केला आहे. या भूमीवर राहणारे बहुतेक लोक ख्रिश्चन आणि हिंदू आहेत. यावर वाद सुरूच आहे. दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board) वक्फ सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ नमाज अदा करताना काळ्या पट्ट्या दंडाला बांधण्यास सांगितले होते. (Waqf Amendment Bill)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community