शेकडो वर्षे जुन्या कानिफनाथ मंदिरावरही Waqf Board चा दावा

70
शेकडो वर्षे जुन्या कानिफनाथ मंदिरावरही Waqf Board चा दावा
शेकडो वर्षे जुन्या कानिफनाथ मंदिरावरही Waqf Board चा दावा
आहिल्यानगर जिल्ह्यातील कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केला आहे. हे कानिफनाथ मंदिर राहुरी तालुक्यातील मढा गावात असून मंदिर संस्थानाने वक्फ बोर्डाचा (Waqf Board) दावा फेटाळला आहे. तसेच कानिफनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड यांनी वक्फ बोर्डाचा (Waqf Board) निषेध केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याप्रकरणी कानिफनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड म्हणाले की, २०११, २०१२ आणि २०१७ ला वक्फ बोर्डाने (Waqf Board) कानिफनाथ मंदिराला नोटीस जारी केली होती, हिंदू धर्मात कानिफनाथ देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षांआधी कानिफनाथ हे राजयोगी होते. ७०० शिष्य, हत्ती उंट, सेवक आणि सैनिक त्यांच्याकडे होते. त्यावेळी राजे महाराजे यांनी त्यांना इनामी जमीन दिल्याची माहिती कानिफनाथ संस्थेचे अध्यक्ष मरकड यांनी दिली आहे.

मात्र तरीही मंदिरांचे दर्गाहमध्ये रुपांतर करण्याच्या कथित प्रयत्नादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकारणाकडे गेले आहे. त्यानंतर न्यायाधिकरणाने मंदिराच्या संरचनेत बदल करण्यास नकार दिला आहे. दरम्यान वक्फ बोर्डाने मंदिरावरच नाही तर, उद्योगपतींची घरे, धार्मिकस्थळांवर वक्फ बोर्ड (Waqf Board)  दावा करत आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.