देशातील ३ लाख ३० हजारांवर मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात असून ५८ हजारांहून अधिक मालमत्तांवर वक्फने (Waqf Board) बेकायदाशीर रित्या मालकी मिळवली आहे. ऑनलाईन पोर्टलवर वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) बेकायदा मालमत्तांची नोंद करण्यात आल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे.
केंद्र सरकारची अधिवेशनात माहिती
केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना लोकसभेत वक्फ बोर्डाच्या मालमत्तांची माहिती दिली. त्यावेळी रिजिजू म्हणाले, वक्फ बोर्डाच्या ताब्यात ५८ हजार ९२९ इतकी मालमत्ता आहे. याशिवाय देशभरात ३ लाख २९ हजार ९२५ मालमत्ता असल्याची नोंद वक्फ बोर्डाने (Waqf Board) सरकारी दफ्तरात केली आहे. त्यामुळे रेल्वे, संरक्षण दलापाठोपाठ सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) ताब्यात असल्याची चर्चा आहे. कारण वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) ताब्यातील जमिनीचे क्षेत्रफळ ३ हजार ८०४ चौरस किलोमीटर येवढे आहे.
( हेही वाचा : Operation Muskan-13 ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार)
दरम्यान केंद्र सरकारने वक्फ बोर्डाशी (Waqf Board) संबंधित कायद्यात सुधारणा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली आहे. या कायद्यामध्ये केंद्राने ४० दुरुस्त्या सुचवल्या आहेत. मात्र विरोधी पक्षांनी या दुरुस्त्यांवर आक्षेप घेतला आहे. दि. २९ नोव्हेंबर पर्यंत ‘जेपीसी’ला अहवाल सादर करण्याची मुदत होती. परंतु विरोधकांनी जेपीसीला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागणारा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनात जेपीसीला अहवाल सादर करण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे.
‘वक्फ’ला जमीन देण्याची प्रथा कधी सुरु झाली
११ व्या शतकात मोहम्मद घोरी (Muhammad Ghori) याने हिंदुस्थानावर आक्रमण केल्यानंतर याच कालखंडात वक्फ बोर्डास (Waqf Board) जमिनी देण्याची प्रथा सुरु झाली. पंजाबमधील मुलतानमध्ये ११८५ साली घोरी याने दोन गावे वक्फ बोर्डास दिली होती.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community