Wardha DJ Testing: डिजेची साऊंड टेस्टिंग जीवावर बेतली; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, वाचा सविस्तर नेमकं काय घडलं?

144
Wardha DJ Testing: डिजेची साऊंड टेस्टिंग जीवावर बेतली; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, वाचा सविस्तर नेमकं काय घडलं?
Wardha DJ Testing: डिजेची साऊंड टेस्टिंग जीवावर बेतली; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, वाचा सविस्तर नेमकं काय घडलं?

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असून, डिजेच्या तालावर गोविंदासह दहीहंडीप्रेमी सुद्धा थिरकताना दिसून येत आहे. मुंबई, पुण्यासाह (Mumbai, Pune Govinda Pathak) गावागावातही हा उत्साह दिसून येत आहे. पात्र, वर्धा जिल्ह्याच्या सालोड हिरापूर येथे दहीहंडीच्या एकदिवस अगोदरच या आनंदावर दु:खाचं विरझन पडलं आहे. येथे नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Wardha DJ Testing)

वर्धा जिल्ह्याच्या (Wardha District) सालोड हिरापूर (Salod Hirapur) येथे विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरुन थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न या डीजेचालकांनी केला. मात्र, यावेळी विजेचा हायपॉवर विद्युत धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सालोड (हिरापूर) येथे ही घटना घडली. सूरज चिंदूजी बावणे (Suraj Chinduji Bawane) वय (27 वर्षे) आणि सेजल किशोर बावणे (Sejal Kishore Bawane) वय (13 वर्षे) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत.    

(हेही वाचा – डोळा मारणे हा विनयभंगच; Mumbai Mazgaon District Megistrate चा महत्वाचा निर्णय; आरोपीला सुनावलेली शिक्षा )

दहीहंडीच्या उत्सवाची जोरदार आणि जल्लोषात तयारी सुरू असतानाच, आपल्या नवीन डीजे व्यावसायाचा शुभारंभ झाल्याने सर्वचजण खुश होते. तर, मंगळवार (27 ऑगस्ट) रोजी दहीहंडीमध्ये एकदम नाद खुळा डीजे वाजवला जाईल, या आनंदात डीजेची तपासणी करण्यासाठी सूरज आणि सेजल गेले होते. मात्र, त्यांच्या निधनाने दहीहंडी उत्सवावर दु:खाचे विरजण पडले. दोघांच्या अशा अपघातील मृत्युने परिसरात शोककळा पसरली, तसेच दहीहंडी उत्सावाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले.  

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.