सध्या संपूर्ण देशभरात सातत्याने हवामान बदल होत आहे. केरळपासून कर्नाटक, विदर्भ आणि उत्तरेत दिल्ली-पंजाब या राज्यांना सुद्धा हवामान बदलाचा फटका बसला आहे. रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागात गारपीटीसह जोरदार पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात वीज कोसळून नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवारी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गारपीटीसह जोरदार पाऊस सुरू असल्याने द्राक्ष, कांदा, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे.
या अवकाळी पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानासंदर्भात आढावा घेऊन त्यावर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई १० एप्रिल २०२३ येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
( हेही वाचा : मंदिराच्या सभामंडपावर झाड कोसळून मोठी दुर्घटना! ७ भाविकांचा मृत्यू; ५ गंभीर, ४० जखमी )
राज्यभरात पावसाची शक्यता
ढगांच्या गडगडाटासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील काही भागात पाऊस पडेल तसेच गोव्यातही अशीच परिस्थिती असेल. तसेच पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उष्णतेच्या लाटेची चिन्हे नाहीत
येत्या काही दिवसात तापमानात वाढ झाली तरीही किमान पुढील पाच दिवस देशात उष्णतेच्या लाटेची चिन्हे नाहीत असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी व संलग्न विदर्भ भागात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पुढच्या तीन ते चार तासात या भागात हलका ते मध्यम पावसांची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community