INS Guldar : कोकणच्या पर्यटनात आता युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ भर घालणार

32
INS Guldar : कोकणच्या पर्यटनात आता युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ भर घालणार
INS Guldar : कोकणच्या पर्यटनात आता युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ भर घालणार

भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’चा (INS Guldar) ताबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (Maharashtra Tourism Development Corporation) आला असून आता ही युद्धनौका विजयदुर्ग (Vijaydurg) समुद्राच्या तळाशी ठेवली जाणार आहे. समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या (Scuba diver) माध्यमातून पर्यटकांना ही युद्धनौका पाहता येईल, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. (INS Guldar)

हेही वाचा-“कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारहाण करणार नाही” ; Bombay High Court चे निरीक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची गुलदार ही निवृत्त युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडे मागितली होती. नौदलामध्ये 40 वर्षे सेवा बजावल्यानंतर ही युध्दनौका सेवेतून निवृत्त झाली. कारवारमधील नौदलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमात नौदलाच्यावतीने या युध्दनौकेची कागदपत्रे पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्यात आले. (INS Guldar)

हेही वाचा-हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला ३० दिवसांची मुदतवाढ; पणनमंत्री Jayakumar Rawal यांची माहिती

त्यामुळे संरक्षण दलातून गुलदारचे महाराष्ट्र राज्याकडे अधिकृतपणे हस्तांतरण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने चार पाणबुड्या विकत घेण्यात येणार आहेत. पाणबुडीतून समुद्रतळ आणि युध्दनौकाही दिसेल अशी योजना आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. (INS Guldar)

हेही वाचा-मुस्लिम माजी नगरसेवक Hakeem Qureshi शाळकरी मुलींना करायचा इस्लाम स्वीकारण्यास जबरदस्ती

हस्तातंर झाल्यानंतर ‘आयएनएस गुलदार’ लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग समुद्रात आणली जाईल. तेथे युद्धनौका शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल. त्यानंतर युद्धनौका विजयदुर्ग समुद्रात बुडवण्यात येईल. समुद्राच्या तळाशी स्थिरावल्यानंतर या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे. ज्यांना स्कुबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने तीन ते चार पाणबुड्या विकत घेण्यात येणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. (INS Guldar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.