कुराणातील ‘ती’ हिंसक आयते हटवा म्हणणारे वासिम रिझवी अखेर बनले ‘काफिर’! 

कुराणात २६ आयते घुसवण्यात आली आहेत, जी पिढ्यानपिढ्या वाचून मुस्लिम समाज हिंसक बनत आहे, जिहादी बनत आहे, असे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सय्यद वासिम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. 

अवघ्या भारतात १४.२ टक्के लोकसंख्या असलेल्या मुसलमानांमध्ये हाताच्या बोटावर समाजसुधारक सापडतील, कारणही तसेच आहे. कुणालाही धर्मात ढवळाढवळ करण्याची परवानगी नसते. अर्थात या धर्माचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेल्या सौदीतील सरकार विज्ञानवादी बनत कोरोनाची लस घेण्यासाठी सक्ती करते, परंतु भारतात तेच मुसलमान त्याला ‘हराम’ म्हणत विरोध करतात. हा विरोधाभास आहेच. तरीही भारतात सैय्यद वासिम रिझवी यांच्या सारखे काही मुसलमान हे त्यांच्या धर्मात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जातात, मात्र त्यांच्या विरोधात देशभरातील मुसलमान उभे राहतात. त्यांना धर्मातून हाकलून देत काफिर ठरवतात. ट्विटरवर त्यांचा शिरच्छेद करण्याचे आवाहन  करतात. भारतातील मुसलमान सौदीच्या तुलनेत किती धर्मांध बनली आहेत, याचे हे द्योतक आहे.

काय म्हटले वासिम रिझवी यांनी त्यांच्या याचिकेत? 

  • सय्यद वासिम रिझवी हे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.
  • जिहादी वृत्ती वाढवणाऱ्या ‘ती’ २६ आयते कुराणात नंतर घुसवण्यात आली आहेत.
  • इस्लाममधील तीन खलिफांनी ही घुसखोरी केलेली आहे.
  • युद्धाच्या माध्यमातून जगभरात इस्लाम पसरवण्यात यावा, या उद्देशाने हे करण्यात आले होते.
  • महंमद यांच्यानंतर पहिले खलिफा हजरत अबू बक्र, दुसरे खलिफा हजरत उमर आणि तिसरे हजरत उस्मान यांनी ही आयते घुसवली आहेत.
  • पिढ्यानपिढ्या मुसलमान हे २६ आयते वाचत आले आहेत.
  • जी हिंसेला प्रोत्साहन देतात. त्यांचा वापर दहशतवादी जिहादी बनवण्यासाठी करतात.
  • तसेच तरुणांना धर्मांध बनवून हिंसेला प्रवृत्त करतात. या आयतांमुळे निरपराधांचे प्राण जात आहेत.

(हेही वाचा : शिवसेना पुन्हा म्हणणार…तरीही आम्ही हिंदुत्ववादीच! )

मुस्लिम समुदायाचा रिझवी यांना विरोध!  

सय्यद वासिम रिझवी यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्यांचा मुस्लिम समुदायाने तीव्र विरोध करायला सुरुवात केली आहे. इस्लामी धर्मगुरू हुसेन जाफरी डंपी यांनी तर रिझवी यांचा शिरच्छेद करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी २० हजार रुपयांचे बक्षीस लावले आहे. डंपी यांनी व्हिडिओ जारी करून तशी धमकी दिली आहे. रिझवी यांच्यामुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करा अन्यथा प्रक्षोभक परिस्थिती निर्माण होईल. त्यांचा बोलविता धनी दुसरा आहे, त्याचाही पर्दाफाश केला पाहिजे, असे डंपी यांनी उत्तर प्रदेश सरकारला म्हटले आहे. तर शिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ता मौलाना यासुब अब्बास यांनी कुराणातील एकही आयते हटवता येणार नाही. दरम्यान मुंबईतील रझा अकादमी या संघटनेने तर ट्विटरवरून रिझवी यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. वासिम रिझवी हा अत्यंत भयानक विषाणू आहे. त्यावर तात्काळ उपचार करण्याची गरज आहे. अन्यथा तो सर्वत्र पसरले असे रझा अकादमीने म्हटले आहे. लाखो वेळा हे जग बदलेल पण कुराण बदलणार नाही, असेही रझा अकादमीने म्हटले आहे.

तथाकथिक समाजवाद्यांचे मौन! 

हिंदू धर्मात भिंग लावून दोष शोधून काढत त्यात बदल करण्याचा आग्रह धरणारे, त्यासाठी आकांडतांडव करणारे, हिंदू धर्म लवचिक आहे, तो सहिष्णू आहे, त्यामुळे अमुक एक नियम कडक वाटतो तो काढलाच पाहिजे म्हणत हिंदू धर्माला टाकाऊ, जुनाट, स्त्री-विरोधी, जात्यंध अशी दूषणे देणारे तथाकथित समाजवादी मंडळी रिझवी यांनी उठवलेल्या मुद्यावर मिठाची गुळणी घेऊन का गप्प आहेत?, असा प्रश्न आता समाजातून विचारला जात आहे. रिझवी यांनी मुस्लिम धर्मात सुधारणावादी विचार मांडले म्हणून त्यांचा शिरच्छेद करण्याचे आवाहन करणाऱ्यांविरुद्ध हे समाजवादी का पेटून उठत नाहीत, अशीही विचारणा आता होवू लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here