Waste disposal fee : महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी कचरा निर्मुलन आकारावर भर; मुंबईकरांना, लवकर द्यावा लागणार कचरा टॅक्स

41
Waste disposal fee : महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी कचरा निर्मुलन आकारावर भर; मुंबईकरांना, लवकर द्यावा लागणार कचरा टॅक्स
Waste disposal fee : महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी कचरा निर्मुलन आकारावर भर; मुंबईकरांना, लवकर द्यावा लागणार कचरा टॅक्स
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा डोलारा सांभाळण्यासाठी आता महसूल वाढवण्यावर भर दिला जाणार असून याचा एक भाग म्हणून महापालिकेने आता कचऱ्याच्या निर्मुलनासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अखेर कचऱ्याच्या निर्मुलनासाठी कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जागेच्या क्षेत्रफळानुसार ठोकप्रमाणे प्रति माह शंभर रुपये, पाचश रुपये आणि एक हजार रुपये अशाप्रकारे शुल्क कर रुपात वसूल केले जाणार आहेत. यासाठी आयुक्तांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर याबाबत लोकांकडून हरकती व सूचना मागवत सुधारीत मंजूर प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याला पाठवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Waste disposal fee)

(हेही वाचा- महाविकास आघाडीतील आमदार, खासदार संपर्कात…? भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचा गौप्यस्फोट)

मुंबईतील व्यावसायिकांनाच सध्या कचरा निर्मुलन  शुल्क आकारला जात आहे. मात्र, मुंबईत घरोघरी कचरा निर्माण होत असून महापालिका प्रशासन झोपडपट्टी वर्गात घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेला कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट देवनार आणि कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर लावत असते. मुंबईमध्ये सध्या सुमारे साडेहजार मेट्रीक टन दिवसाला कचरा गोळा केला जात आहे. हा कचरा दैनदिन साफ करून मुंबई महापालिका प्रशासन मुंबईत स्वच्छता राखण्याचे काम अविरत करत असते. त्यामुळे साफसफाई राखण्यात येत असल्याने आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याने सन २०१९-२०मध्ये अजोय मेहता त्यानंतर सन २०२०-२१मध्ये प्रविणसिंह परदेशी यांनी प्रत्येक सोसायट्यांना या  कचर्‍याचे शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे केली होती. मात्र, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी तेव्हा नगरसेवक असल्याने तसेच कोविडची लाट असल्याने होवू शकली नाही आणि त्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केला होता. (Waste disposal fee)

परंतु आता महापालिकेने प्रत्येक सोसायट्यांना कचरा निर्मुलन आकार वसूल करण्याचा निर्णय घेतला असून याचा मसुदा तयार करून पुढील प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मासिक १०० रुपये तर पाचशे चौरस फुटाच्यावरील बांधकामांसाठी मासिक ५०० रुपये आणि तीन हजारांहून अधिक चौरस फुटांच्या घरांसाठी मासिक १ हजार रुपये अशाप्रकारे कचरा निर्मुलन आकार वसूल करण्याचे निश्चित केले आहे. याबाबतच्या मसुद्याची प्रत अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आली असून ही प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर जनतेकडून हरकती व सूचना मागवल्या जाणार आहे. या सुचनांनुसार सुधारीत प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांच्या मंजुरीने नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर या कचरा निर्मुलन शुल्काची आकारणी केली जाईल,असे माहिती मिळत आहे. (Waste disposal fee)

(हेही वाचा- KEM Hospital परिसरात डिन बंगल्यासह इतर बांधकाम तोडून बांधणार शताब्दी टॉवर!)

या कचरा निर्मुलन शुल्काची आकारणी मालमत्ता कराच्या देयकांमधून केली जाणार असून जागेच्या क्षेत्रफळानुसार कराची आकारणी करताना मासिक निश्चित केलेल्या शुल्काप्रमाणे प्रत्येक सहा महिन्यांचे एकत्र शुल्काचा अंतर्भात मालमत्ता कराच्या देयकात असेल असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजवर ही शुल्क आकारणी कागदावरच असली तरी प्रत्यक्षात मुंबईकरावर या शुल्क आकारणी अंमलबजावणी केव्हा होते, हे लवकरच जाहीर होती. मात्र, महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता या कराची आकारणी होणे आवश्यक असून आजवर याच्या अंमलबजावणीला विलंब झाला असला तरी भविष्यात जर याची अंमलबजावणी झाल्यास महापालिकेचा कारभाराला गती देण्यासाठी हे कर वसुली महत्वाची बाब ठरणार आहे. (Waste disposal fee)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.