राज्यातील पाण्याची समस्या गंभीर (Water crisis) होत आहे. पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण वाढत्या उष्णतेमुळं पाण्याची मागणी वाढत आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्यानं घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात फक्त २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मराठवाड्यातील (marathwada) पाणीसाठा १२ टक्क्यांवर आला आहे. अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. (Water crisis)
(हेही वाचा –Crime: बीडमध्ये पोलिसांनी कारमधून जप्त केली १ कोटी रुपयांची रोकड)
सध्या जायकवाडीत (Jayakwadi) फक्त 7.74 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात निम्म्याहून अधिक धरण भरलेलं होतं. बीड, धाराशीव आणि लातूरमध्ये अनेक छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील धरणसाठा 23 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याचवेळी जलसाठा 30 टक्के होता. दरम्यान, कोयना धरणात (Koyna Dam) 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोयनेतून होणाऱ्या वीजनिर्मीतीत देखील घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Water crisis)
(हेही वाचा –Chilkur Balaji Temple : ऐकावे ते नवलंच! चिल्कुर बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यावर परदेशात जाण्याची मिळते संधी…)
उत्तर महाराष्ट्रात देखील मे महिन्यात 30.43 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर गंगापूर धरणात 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरीकडं भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातील पाणीसाठा 25 टक्क्यांच्या खाली आहे. नागपूर विभागात जलसाठा 40 टक्क्यांवर तर अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा 44 टक्क्यांवर आला आहे. तर कोकणातील पाणीसाठा 42 टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे. (Water crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community