गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात येत्या २३ व २४ एप्रिल दरम्याने जलवाहिनी बदण्याचे काम हाती घेण्यात येत असून या कामांसाठी गोरेगाव, दिंडोशी तसेच कांदिवली पूर्व भागांमध्ये पाणी पुरवठज्ञ बंद राहणार आहे, अर्थात १०० टक्के पाणी कपात राहणार आहे. (Water Cut)
गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील सुमारे ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी महापालिकेच्यावतीने बदली करून त्याऐवजी ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हे मंगळवारी २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून बुधवार २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत म्हणजे एकूण २४ तासांसाठी हे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही भागांत १०० पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित भागांमधील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Water Cut)
(हेही वाचा – Sachin Sawant यांना म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने बोलावले; वर्षा बंगल्यावरील आचारसंहिताभंगाची केली तक्रार)
१०० टक्के पाणीपुरवठा बंद राहणारा भाग:
१. पी दक्षिण विभाग – वीटभट्टी, कोयना वसाहत, स्कॉटर्स वसाहत, कामा इंडस्ट्रीयल इस्टेट, रोहिदास नगर व शर्मा इस्टेट इत्यादी (मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४) (Water Cut)
२. पी पूर्व विभाग – दत्त मंदीर मार्ग, दफ्तरी मार्ग, खोत कूवा मार्ग, खोत डोंगरी, मकरानी पाडा आणि हाजी बापू मार्ग, तानाजी नगर, कुरार गांव, रहेजा संकुल, साईबाबा मंदीर, वसंत व्हॅली, कोयना वसाहत (मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४)
३. आर दक्षिण विभाग – बाणडोंगरी, कांदिवली (पूर्व) (मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४) (Water Cut)
४. पी दक्षिण विभाग – पांडुरंगवाडी, गोकूळधाम, जयप्रकाश नगर, नाईकवाडी, गोगटेवाडी, कन्यापाडा, कोयना वसाहत, आय. बी. पटेल मार्ग, यशोधाम, संतोष नगर, विश्वेश्वर मार्ग, प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेट, राजीव गांधी नगर, आरे मार्ग, श्रेयस वसाहत इत्यादी (बुधवार, दिनांक २४ एप्रिल २०२४)
५. पी पूर्व विभाग – पिंपरी पाडा, पाल नगर, संजय नगर, एम. एच. बी. वसाहत, इस्लामिया बाजार, जानू कम्पाउंड, शांताराम तलाव, ओमकार लेआऊट, पिंपरी पाडा, चित्रावणी, स्वप्नापूर्ती, घरकुल, गोकूळधाम, यशोधाम, सुचिताधाम, दिंडोशी डेपो, ए. के. वैद्य मार्ग, राणी सती मार्ग (बुधवार, दिनांक २४ एप्रिल २०२४) (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community