Water Cut : मुंबई शहरातील ‘या’ भागात राहणार १०० टक्के पाणी कपात

मुंबईतील जी उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड जलवाहिनी जल जोडणीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामांसाठी १८ व १९ एप्रिल २०२४ रोजी पाणी कपात केली जाणार आहे. (Water Cut)

12885
Water Cut : मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी ५ ते १० टक्के पाणीकपात 

मुंबईतील जी उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड जलवाहिनी जल जोडणीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामांसाठी १८ व १९ एप्रिल २०२४ रोजी पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे काही भागांत १०० टक्के तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील जनतेने पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (Water Cut)

मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड येथे २४०० मिली मीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी यांची जल जोडणीचे काम गुरुवार, १८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत (एकूण १८ तासांसाठी) हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही भागांत १०० टक्के तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water Cut)

(हेही वाचा – World Art Day 2024 : भारतातील विविध प्रांतामध्ये कशी आहे चित्रकला?)

या भागात राहणार १०० टक्के पाणी कपात
  • एच पूर्व विभाग – वांद्रे रेल्वे टर्मिनस व वांद्रे स्थानक परिसर (गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०२४ व शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल २०२४)
  • जी उत्तर – धारावी लूप मार्ग, नाईक नगर, प्रेम नगर (गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)
  • जी उत्तर – धारावी लूप मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग (गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी धारावी येथील सायंकाळचा पाणीपुरवठा) (Water Cut)

या भागात असेल २५ टक्के पाणी कपात

जी उत्तर – ६०’ रोड, शीव-माहीम लिंक रोड, ९०’ रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कया मार्ग, ए. के. जी. नगर, एम. पी. नगर (गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा) (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.