पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवारी १६ मार्च २०२४ रोजी अचानक बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू झाली. या ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटर पर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. त्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्तीचे काम सोमवारी १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले. भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, बंधाऱ्याची पाणी पातळी पूर्ववत होण्याकरिता कालावधी लागणार असल्याने मंगळवारी १९ मार्च २०२४ रोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात (Water Cut) केली जाणार आहे. (Water Cut)
भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्ये साठविले जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. पिसे बंधाऱ्याच्या गेटमधील रबरी ब्लाडरमधून दिनांक १६ मार्च २०२४ रोजी अचानक बिघाड झाला. त्यातून पाणी गळती झाली. बंधाऱ्यातील पाणीपातळी ३१ मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. सोमवार, दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. (Water Cut)
(हेही वाचा – Mantralaya : मंत्रालयाच्या इमारतीवरून पुन्हा एका व्यक्तीने मारली उडी)
भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर आहे. त्यामुळे पिसे बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढण्यास कालावधी लागणार आहे. बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होईपर्यंत म्हणजेच मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजीच्या म्हणजे एक दिवस पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात (Water Cut) करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community