- विशेष प्रतिनिधी, मुंबई
वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी (जिल्हा ठाणे) येथे ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ०५ ते १० टक्के इतकी घट होणार आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण मुंबईत गुरूवारी १७ ऑक्टोबर २०२४ ते शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ या दोन दिवसांच्या कालावधीत ५ ते १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. (Water Cut)
मुंबई शहर व उपनगरास मुख्यत्वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणाऱ्या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी (जिल्हा ठाणे) येथे ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात (मुंबई शहर व उपनगर) पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ०५ ते १० टक्के घट होणार आहे. (Water Cut)
(हेही वाचा – न्यायमूर्तींच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, CJI D Y Chandrachud यांचा मोठा निर्णय)
या दुरूस्ती कामासाठी सुमारे ४८ तास इतका कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे संपुर्ण मुंबईत गुरूवार १७ ऑक्टोबर २०२४ ते शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ या दोन दिवसांच्या कालावधीत ५ ते १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. (Water Cut)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=DfATlj1jVkc
Join Our WhatsApp Community