Mumbai Water Cut : सोमवारपासून २ डिसेंबरपर्यंत संपूर्ण मुंबईत पाणीकपात

1089
Water Cut : पश्चिम उपनगरातील 'या' भागात शुक्रवार आणि शनिवारी येणार कमी दाबाने पाणी
Water Cut : पश्चिम उपनगरातील 'या' भागात शुक्रवार आणि शनिवारी येणार कमी दाबाने पाणी

पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याची कामे येत्या सोमवारी, २० नोव्हेंबर ते शनिवार, २ डिसेंबर २०२३ या कालावधीत कालावधीत हाती घेण्यात येत आहेत. (Mumbai Water Cut) या कालावधीत मुंबईतील सर्व विभागात १० टक्के पाणीकपात केले जाणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.

(हेही वाचा – Bhandrashekhar Bawankule Uddhav Thackeray : त्यांना रामनामाची अ‍ॅलर्जी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार)

मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम येत्या सोमवारी, २० नोव्हेंबर ते शनिवार, २ डिसेंबरपर्यंत हाती घेण्याचे ठरविले आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे, सोमवार, २० नोव्हेंबर ते शनिवार, २ डिसेंबर या कालावधीत मुंबईत, तसेच मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. (Mumbai Water Cut)

(हेही वाचा – Babar Azam Resigns : पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी तर कसोटी कर्णधार शान मसूद)

मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Mumbai Water Cut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.