मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) पिसे येथील जल उदंचन केंद्रातील संयंत्रात बुधवारी १९ जून २०२४ रोजी दुपारी २.५० वाजता बिघाड झाला. त्यामुळे २० उदंचन पंपांपैकी १३ पंप बंद पडले. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दुरुस्तीचे काम होईपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. (Water Cut)
ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठासुद्धा कमी दाबाने होणार आहे. तसेच उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (Water Cut)
(हेही वाचा – बाळासाहेबांचा फोटो, शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण न घेता निवडणूक लढा; Uddhav Thackeray यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान)
पिसे येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल उदंचन केंद्र आहे. बुधवारी दुपारी येथील संयंत्रात तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, २० पैकी १३ पंप बंद झाले. दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेऊन टप्प्याटप्प्याने पंप सुरू करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत सायंकाळी ७ वाजेपर्यंत पिसे केंद्रातील २० पैकी १७ पंप कार्यरत करण्यात यश आले आहे. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. उर्वरित ३ पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित पंप लवकरच कार्यान्वित करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. असे जल अभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community