शुक्रवारी सकाळी मुंबईतील ‘या’ भागात येणार नाही पाणी

131

दादर पूर्वमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्याने शुक्रवारी ८ जुलै रोजी एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर १२०० मिमी व्यासाची (न्यू तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलाभियंत विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

जलवाहिनी फुटल्याने परिणामी उद्या शुक्रवार, दिनांक ८ जुलै २०२२ रोजी विभागामध्ये पहाटे ४.०० ते सकाळी १०.०० या वेळेत पाणी पुरवठा होणार नाही.संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापलिका प्रशासनाने केले आहे.

एफ / उत्तर विभाग

दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी.

एफ/दक्षिण विभाग

दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.