दहिसर-बोरीवलीकरांचा येणारा मंगळवार पाणी कपातीचा!

मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली (पूर्व) परिसरातील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’ (नॅशनलपार्क) समोर पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर १०५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (जुने दहिसर आऊटलेट) बंद करण्याचे काम मंगळवारी १० मे २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून रात्री १२:०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत बोरिवली, दहिसरमधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठयात कपात करण्यात येणार आहे. तसेच दहिसर मधील काही परिसरांमध्ये १०० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

(हेही वाचा – ‘मविआ’ बहुजनांचं सरकार? तर 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? पडळकरांचा सवाल)

बोरिवली, दहिसर या भागात शुक्रवारी पाणी कपात करण्यात आली होती, त्यानंतर पुन्हा एकदा जलवाहिनीचे काम हाती घेत येत्या मंगळवारी जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येत असल्याने कपात करण्यात येणार आहे.या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विभागातील नागरिकांना केली आहे.

कोणत्या भागात कसा असेल पाणीपुरवठा

बोरिवली (आर मध्य विभाग):

संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजुपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर – (सकाळी ८.३० ते १०.४५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी ८.३० ते १०.०० पाणीपुरवठ्याची वेळ राहील).

दहिसर (आर उत्तर विभाग):

ओवरीपाडा (अंशत:), राजेश कुंपण, शांती नगर, अशोकवन (सखल पातळी परिसर), शिव वल्लभ मार्ग (दक्षिण बाजू), संत ज्ञानेश्वर मार्ग, न्यांसी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर – (सकाळी ८.३० ते १०.४५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी ८.३० ते १०.०० पाणीपुरवठ्याची वेळ राहील).

बोरिवली (आर मध्य विभाग):

काजुपाडा (उंच पातळी परिसर), माने कंपाऊंड, पाटील कंपाऊंड, जगरदेव कंपाऊंड, ओम सिद्धराज संकुल, गिरीशिखर संकुल, मोठी मजीद परिसर – (सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी १०.०० ते ११.३० पाणीपुरवठ्याची वेळ राहील).

दहिसर (आर उत्तर विभाग):

अशोक वन (उंच पातळी परिसर), देशमुख रेसिडेन्सी, साईश्रद्धा फेज १ व २ – (सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी १०.०० ते ११.३० पाणीपुरवठ्याची वेळ राहील).

दहिसर (आर उत्तर विभाग):

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलीफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, संत मिराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर – (सायंकाळी ५.३० ते ७.४० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).

दहिसर (आर उत्तर विभाग):

आनंद नगर, आशिष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, छत्रपती शिवाजी संकुल, भाबलीपाडा, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक इस्टेट, सुधींद्र नगर, केतकीपाडा ऑन लाईन पंपिंग – (रात्री ९.३० ते ११.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, १० मे २०२२ रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here