Water Cut : शनिवार आणि रविवारी उपनगरातील काही भागात पाणी बाणी

8689
Water Cut : शनिवार आणि रविवारी उपनगरातील काही भागात पाणी बाणी

वेरावली जलाशयाच्‍या १८०० मि.मी.जलवाहिनी दुरूस्‍तीचे काम मुंबई महानगरपालिकेच्‍या (Water Cut) वतीने हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शनिवार २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून ते रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत दुरूस्‍ती काम सुरू रहाणार आहे. या कालावधीत जलवाहिनी दुरूस्‍ती कामामुळे के पूर्व, एच पूर्व, एच पश्चिम, पी दक्षिण, एस, एल, आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.

तर, के पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा (Water Cut) पूर्णपणे बंद राहिल. के पूर्व, पी दक्षिण विभागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. एच पश्चिम विभागातील काही परिसरात शनिवारी २ डिसेंबर २०२३ पाणीपुरवठा कमी वेळेकरीता होईल व काही परिसरात रविवारी ३ डिसेंबर २०२३ कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, एच पूर्व, एच पश्चिम, एस आणि एन या विभागातील पाणीपुरवठा (Water Cut) खंडित होणारा परिसर आणि पी दक्षिण, के पूर्व व एच पश्चिम या विभागातील पाणीपुरवठा कमी दाबाने करण्‍यात येणारा तसेच एच पश्चिम विभागातील कमी वेळेकरिता पाणीपुरवठा होणारा परिसर याबाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.

कमी पाणीपुरवठा होणारा परिसर

एल विभाग-

घाटकोपर उच्चस्तर (Water Cut) जलाशय- अशोकनगर, संजयनगर, सांतानगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदीर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली संघर्ष नगर

(नियमित पाणीपुरवठा वेळ- सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजेपासून ते दिनांक ०३.१२.२०२३ सकाळी ८:३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील)

एल विभाग-

घाटकोपर उच्चस्तर (Water Cut) जलाशय- एन एस एस मार्ग, साने गुरूजी नगर, आणि पंपींग, होम गार्ड, हिल नंबर २, हिमाल्या सोसायटी, मिलिंद नगर, वाल्मिकी नगर, संतोषीमाता नगर, द्स्सर कंपाउंड, संजय नगर, बाबा चौक, रठोड मेडीकल, अशोक नगर

(नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी २.३० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजेपासून ते दिनांक ०३.१२.२०२३ सकाळी ८:३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील)

एन विभाग-

घाटकोपर उच्चस्तर (Water Cut) जलाशय- रामनगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जयमल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकरी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर १ व २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलानाकंपाऊंड, हरिपाडा, जगदुषानगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफ नगर, गेल्डानगर, गोळीबार रोड, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ.एन.जी.सी. कॉलनी, माजगावडॉक कॉलनी, गंगावाडीगेटनं. २, सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर, साईनाथनगर, पाटीदारवाडी, रामाजीनगर, भटवाडी, रामाजीनगर, भटवाडी, बर्वेनगर, काजूटेकडी, अकबरलालाकंपाऊंड, आझादनगर, पारसीवाडी, सोनियागांधीनगर, खाडीमशीन, गंगावाडीचाकाहीपरिसर.

(नियमित पाणीपुरवठा वेळ- २४ तास) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजेपासून ते दिनांक ०३.१२.२०२३ सकाळी ८:३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील)

के पूर्व विभाग –

वेरावली १ – बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाषरोड, चाचानगर

(नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी १२.४५ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

के पूर्व विभाग –

वेरावली १ – बांद्राप्लॉट, हरीनगर, शिवाजीनगर,पास्कलकॉलोनी, शंकरवाडी

(नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी १.३० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

(हेही वाचा – Pollution Safety Tips : आरोग्यावरील प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळायचेत ; करा या उपायांचा अवलंब)

के पूर्व विभाग –

वेरावली १ – पंप हाउस, विजय राउत मार्ग, पाटील वाडी, हंजर नगर, झगडा पाडा, पारसी कॉलनी, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल,आशीर्वाद चाळ, गुंदवली आझाद मार्ग, सर्वोदय नगर (Water Cut)

(नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ५.०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

के पूर्व विभाग –

वेरावली २ – विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजीजुमान चाळ, कोळडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, चकाला गावठान, डोमेस्टीक एअरपोर्ट, विलेपार्लेचा बहुतांश भाग (Water Cut)

(नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडित राहील)

पी दक्षिण विभाग –

वेरावली १ – बिंबीसारनगर

(नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल)

पी दक्षिण विभाग –

वेरावली १ – राम मंदीर, गोरेगाव पश्चिम

(नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडीत राहील)

के पूर्व विभाग –

वेरावली १ – ओल्ड नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलस वाडी परिसर अंबावाडी, गुंदवली परिसर

(नियमित पाणीपुरवठा वेळ- रात्री ८.०० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडीत राहील)

के पूर्व विभाग –

वेरावली १ – शिव टेकडी, दत्त टेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर, समर्थ नगर, स्मशान टेकडी, अग्रवाल नगर, श्याम नगर, मेघवाडी, नटवर नगर, रोहिदास नगर, गांधी नगर, सरस्वती बाग, जोगेश्वरी स्थानक रोड, नवलकर वाडी, एच. एफ. सोसायटी मार्ग, साईवाडी, मोगरापाडा, इंदीरा नगर (Water Cut)

(नियमित पाणीपुरवठा वेळ- दुपारी ३.५० ते सकाळी ६.२५ वाजेपर्यंत) (दिनांक ०३.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा खंडीत राहील)

के पूर्व –

महाकाली मार्ग, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी नंबर ३, शेर –ए-पंजाब, बिंद्रा कॉम्प्लेक्स, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, पूनम नगर, गोनी नगर, पी. एम. जी. पी. कॉलनी, कोकण नगर, संजय नगर

(नियमित पाणीपुरवठा वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० वाजेपर्यंत) (दिनांक ०३.१२. २०२३ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० दरम्यान पाणीपुरवठा खंडित राहील.)

एच पूर्व –

टीपीएस ३, टीपीएस पाच, आगरी पाडा, सेवा नगर, हनुमान टेकडी, ७ वा रस्ता, खार सबवे, डवरी नगर, शिवाजी नगर, गावदेवी, वाकोला पाईपलाईन मार्ग, नेहरू मार्ग (Water Cut)

(नियमित पाणीपुरवठा वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत) (दिनांक ०३.१२. २०२३ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० दरम्यान पाणीपुरवठा खंडित राहील.)

एच पश्चिम –

संपूर्ण सांताक्रुझ पश्चिम विभाग, गजारबंध, खार पश्चिमेचा पश्चिम रेल्वे परिसर आणि डॉ. आंबेडकर मार्ग मधील काही परिसर

(नियमित पाणीपुरवठा वेळ – पहाटे ४.०० ते सकाळी ९.०० वाजेपर्यंत) (दि.०२.१२.२०२३ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ८.३० व दिनांक ०३.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.)

(हेही वाचा – Mizoram Results Postponed : ख्रिस्त्यांच्या प्रार्थनेसाठी मिझोरामची मतमोजणी पुढे ढकलली)

एच पश्चिम –

वांद्रे पश्चिम

(नियमित पाणीपुरवठा वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ९.०० वाजेपर्यंत) (दिनांक ०२.१२.२०२३ रोजी सकाळी ०४.३० ते सकाळी ०८.३० व दि.०३.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.)

के पश्चिम –

पूर्ण के पश्चिम विभाग (Water Cut)

(नियमित पाणीपुरवठा वेळ – दि.०२.१२.२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजेपासून ते दि. ०३.१२.२०२३ सकाळी ०८.३० वाजेपर्यंत) (पाणीपुरवठा खंडित राहील.)

एस –

गौतमनगर निम्नपातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रोड, पवई

(नियमित पाणीपुरवठा वेळ – दि.०२.१२.२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजेपासून ते दि. ०३.१२.२०२३ सकाळी ०८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील)

के पूर्व –

चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, शिवाजी नगर. ए. के. मार्ग, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, मरोळ मरोशी मार्ग, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, जे. बी. नगर, बगरखा रोड, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी

(निमित पाणीपुरवठा वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (दि.०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने / खंडीत राहील).

के पूर्व –

मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. रोड क्रमांक १ ते २३, ट्रान्स आपर्टमेंट, कोंडीविटा, उपाध्यायनगर, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा.

(नियमित पाणी पुरवठा वेळ – सकाळी ११.०० ते दुपारी २.००) (दि.०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने/ खंडित राहील.

के पूर्व –

विजय नगर मरोळ, मिलीट्री रोड, मरोळ मरोशी मार्ग, गावदेवी, मरोळ गाव, चर्चरोड, कदम वाडी, भंडारवाडा. (Water Cut)

(नियमित पाणीपुरवठा सायं ०६:०० ते रात्री ०९:३०) (दि.०२.१२.२०२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

के पूर्व –

सीप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ

(नियमित पाणीपुरवठा वेळ – २४ तास) (दि.०२.१२.२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजेपासून ते दि. ०३.१२.२०२३ सकाळी ०८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.) (Water Cut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.