मुंबई महापालिकेच्या पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या कालावधीत म्हणजेच मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. त्यातील विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व भागात मंगळवार, बुधवारी पाणी कपात असेल तर काही भागात अपुरा पाणी पुरवठा होईल. तर विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम भागात २४ तास पाणी कपात असेल.
पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
( हेही वाचा: आता सरकारी मराठी भाषा होणार सोपी )
अंधेरी- जोगेश्वरी -विलेपार्ले या भागात मंगळवारी नसेल पाणी
- बांद्रेकर वाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर
- वांद्रे प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल कॉलनी, शंकर वाडी
- पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटील वाडी, हंजर नगर, झगडा पाडा, पारसी कॉलनी, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ, गुंदवली आझाद मार्ग, सर्वोदय नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, पंथकीबाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवनविकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, चकाला गावठाण, डोमेस्टीक एअरपोर्ट, विलेपार्लेचा बहुतांश भाग
- मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, उपाध्याय नगर, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा – चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, शिवाजी नगर, ए. के. मार्ग, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, मरोळ-मरोशी मार्ग, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी ओल्ड नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलस वाडी परिसर अंबावाडी, गुंदवली परिसर
अंधेरी- जोगेश्वरी -विलेपार्ला भागात बुधवारी पाणी नसेल
- शिव टेकडी, दत्त टेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर, समर्थ नगर, स्मशान टेकडी, अग्रवाल नगर, श्याम नगर, मेघवाडी, नटवर नगर, रोहिदास नगर, गांधी नगर, सरस्वती बाग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, नवलकर वाडी, एच. एफ. सोसायटी मार्ग, साईवाडी, मोगरापाडा, इंदिरा नगर
- महाकाली मार्ग, पेपरबाक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकुल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, पूनम नगर, गोनी नगर, पी. एम. जी. पी. कॉलनी, कोकण नगर, संजय नगर – *
या भागात कमी दाबाने होणार पाणी पुरवठा
विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, मरोळ-मरोशी मार्ग, गावदेवी, मरोळ गाव, चर्च मार्ग, कदम वाडी, भंडारवाडा
सीप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ
या भागात २४ तास पाणी कपात
विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम के/पश्चिम) या विभागात – २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० ते ३०. नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील.
Join Our WhatsApp Community