Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात जलवाहिनी दुरूस्तीमुळे पाणीकपात

3569
एफ दक्षिण विभागातील फॉसबेरी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीस सोमवारी अचानक गळती सुरू झाली. रे रोड बीपीटी गोदाम नजीक उद्भवलेली पाणी गळती रोखण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. परंतु, या ठिकाणी सुरू असलेल्या दुरुस्ती कामात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे दुरुस्तीचे काम स्वहस्ते (मॅन्युअली) करण्याचा निर्णय जलकामे विभागाने घेतला आहे.
जलवाहिनी दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून ते उशिरापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या गळतीमुळे एफ दक्षिण विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम (Water Cut) झाला आहे. त्यामुळे एक दक्षिण विभागातील शिवडी पूर्व, दारूखाना, इंदिरानगर तसेच नजीकच्या परिसरात सोमवार  ३० डिसेंबर २०२४ रोजी होणारा सायंकाळी सहा ते रात्री ८:४० या नियोजित वेळेत होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही.(Water Cut) तसेच मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी आंबेवाडी तसेच दत्ताराम लाड मार्ग येथे पहाटे चार ते सकाळी ६:४५ या वेळेत होणारा पाणीपुरवठा होणार नाही. (Water Cut) या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.