- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मालाड पश्चिम येथील लिबर्टी जलबोगदा येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती होत असल्याचे निदर्शनास आले असून या गळती दुरुस्तीचे काम शुक्रवारी २४ जानेवारी २०२५ रात्री साडेदहा वाजता हाती घेण्यात येणार आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचे कामकाज शनिवारी २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम येथील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी २५ जानेवारी २०२५ रोजी बंद राहणार आहे. (Water Cut)
(हेही वाचा – अतिरिक्त कर टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करा, Donald Trump यांची सर्व देशांना खुली ऑफर)
संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या टनेलचे काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांत या भूमिगत जलबोगद्यावर खासगी व्यक्तीने कुपनलिका अर्थात बोअरवेल खोदण्याचा प्रयत्न केला होता. यात जलबोगदा फोडला गेल्याने यातून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. त्यामुळे जलबोगद्याला मोठ्याप्रमाणात असलेली ही दुरुस्ती करण्यास काही दिवस लागले होते. यासाठी टनेलचे काम करणाऱ्या कंपनीला निमंत्रित करून त्यांच्याकडून हे काम करून घेण्यात आले होते. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. (Water Cut)
(हेही वाचा – ‘दक्ष’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासन गतीने कार्यवाही करणार; कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांची ग्वाही)
या विभागात राहणार पाणीपुरवठा बंद
मालाड पश्चिम : अंबुजवाडी, आजमी नगर, जनकल्याण नगर
गोरेगाव पश्चिम : उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग
हेही पहा –
Join Our WhatsApp Community