
-
सचिन धानजी, मुंबई
मुंबईकरांना पुरवठा होणाऱ्या जलसाठ्यांमध्ये सध्या केवळ ३२ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने पाणीकपातीचा सामना करावा लागेल अशाप्रकारचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारे पाणीकपात लादली जाऊ नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी हे प्रयत्नशीर आहे. त्यामुळे सध्याच्या तलावातील पाणी साठ्याच्या तुलनेत उर्ध्व वैतरणा आणि भातसामधील राखीव साठ्यातील पाणी मुंबई महापालिकेला देण्यासाठी प्रशासनाकडून मागणी करण्यात आलेली आहे. ही मागणी तत्वत: मान्य करण्यात आल्याने भविष्यात उर्ध्व वैतरणा आणि भातसामधील राखीव कोट्यातील जलसाठा उपलब्ध होणार असल्याने भविष्यात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची कपात लादण्याची वेळ येणार नाही अशाप्रकारचा विश्वास जल अभियंता विभागाच्यावतीने व्यक्त केला जात आहे. (Water Cut)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरण तथा तलावांमधून दैनंदिन ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या यासर्व धरण तथा तलावांमध्ये वर्षभराच्या एकूण १४ लाख ४७ हजर ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत सध्या ४ लाख ७० हजार दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा सुमारे ३२ टक्के एवढा आहे तर मागील वर्षी याच तारखेपर्यंत सुमारे २७ टक्के एवढा पाणीसाठा होता. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ३ लाख ९० हजार ४०० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा त्याप्रमाणे पाच टक्के अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. (Water Cut)
(हेही वाचा – मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड Tahawwur Rana ला अखेर भारतात आणले)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत साठा अधिक असला तरी पाण्याची वाढती मागणीचा विचार करता भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून पाणीकपात करावी लागू नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी भातसा आणि अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील राखी जलसाठ्यातून महापालिकेला पाणी उपलब्ध व्हावे यसाठी सरकारकडे मागणी केली आहे. याला जलसंपदा विभागाने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये याबाबतची परवानगी प्राप्त मिळाल्यानंतर या दोन्ही धरणांमधील राखीव जलसाठ्यातून महापालिकेला पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या उपलब्ध जलसाठ्यानुसार मुंबईकरांना पाणीपुरवठा केल्यानंतर जर पाणीसाठा कमी भासल्यास या दोन्ही धरणांमधील राखीव जलसाठ्यातून पाणी उचलून मुंबईकरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्यामुळे भविष्यात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची पाणीकपात लादली जाणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (Water Cut)
मुंबईकरांची एकूण पाण्याची मागणी : एकूण १४ लाख ४७ हजर ३६३ दशलक्ष लिटर
१० एप्रिल २०२५ पर्यंतचा पाणीसाठा : ४ लाख ७० हजार दशलक्ष लिटर( ३२ टक्के)
१० एप्रिल २०२४ पर्यंतचा पाणीसाठा : ३ लाख ९० हजार ४०० दशलक्ष लिटर (२७ टक्के)
१० एप्र्थ्ल् २०२३ पर्यंतचा पाणीसाठा : ४ लाख ८२ हजार दशलक्ष लिटर (३३.३० टक्के)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community