मुंबई महानगरपालिकेतर्फे विहार जलशुद्धीकरण केंद्रातील १२०० मिली मीटर फिल्टर बायपास जलवाहिनी ही १२०० मिली मीटर जलशुद्धीकरण पाण्याची वाहिनी यांना जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवार दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजेपासून रात्रौ ८ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामादरम्यान महानगरपालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
कोणत्या वस्त्यांमध्ये कसा होणार परिणाम
- – बिट क्रमांकः १६० (अंशतः) – गुरूनानक नगर, गैबन शाह दर्गा रोड, सलमा कंपाऊंड, एन. एस. एस. मार्ग – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- – बिट क्रमांकः १६० (अंशतः) – शिवाजी नगर – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- – बिट क्रमांकः १६३ – संपूर्ण काजूपाडा, सुंदरबाग गल्ली, इंदिरा नगर, गणेश मैदान, बुद्धपर्ण कुटीर – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- – बिट क्रमांकः १६४ – प्रिमियर रोड काळे मार्ग ते ब्राम्हणवाडी, कोहिनूर सिटी, नौपाडा, राजू बेडेकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), कमानी – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- – बिट क्रमांकः १६५ – ख्रिश्चन गांव, जय अंबिका नगर, भारतीय नगर, हलाव पूल, कोहिनूर रुग्णालय, मसरानी गल्ली, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग) (अंशतः), पाईप मार्ग – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- – बिट क्रमांकः १६६ – एम. एन. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), क्रांती नगर, संदेश नगर, वाडिया वसाहत, किस्मत नगर, शांती नगर – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- – बिट क्रमांकः १६७ – विनोबा भावे नगर, बुद्ध वसाहत, ब्राम्हणवाडी, ‘एल’ विभाग कार्यालय, एस. जी. बर्वे मार्ग, न्यू मिल मार्ग – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- – बिट क्रमांकः १६८ – पारीख खादी, सर्वेश्चर मंदीर मार्ग, टाकीया वार्ड, मॅच फॅक्टरी गल्ली, कपाडिया नगर, बेलग्रामी मार्ग, टॅक्सीमॅन वसाहत, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. मार्ग), हरीयानवाला गल्ली, सी. एस. टी. मार्ग, कल्पना नगर, महाराष्ट्र नगर, भाभा रुग्णालय – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).
- -बिट क्रमांकः १७१ (अंशतः)* – चुनाभट्टी पंपिंग – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल).