मुंबईत या ठिकाणी दोन दिवस पाणी नाही!

113

मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्व उपनगरामध्ये ‘एन’ विभागातील विद्यविहार सोमैया नाल्याखालून महानगरपालिका वसाहत या ठिकाणी सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे टप्पा १चे काम बुधवारी १८ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता हाती घेण्यात येत आहे. हे काम गुरुवारी १९ मे २०२२ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

( हेही वाचा : मुंबईत २४ तास धावणाऱ्या लोकलची ‘अशी’ होते देखभाल )

या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

या भागांमध्ये पाणी पुरवठा बंद तर काही ठिकाणी पाणी कपात

  • ‘एल पूर्व’ (कुर्ला)विभाग : राहूल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग – (पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० व रात्री ९.०० ते मध्यरात्री ३.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
  • ‘एन’ (घाटकोपर)विभाग : राजावाडीचे सर्व क्षेत्र, (एम. जी. मार्गाची पश्चिम बाजू), चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हेली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ. एन. जी. सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता – (मध्यरात्री ३.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
  • ‘एम पश्चिम’ (चेंबूर, टिळक नगर)विभाग : टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर १४९ व १५१ – *(पहाटे ५.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).*
  • ‘एफ उत्तर’ (शीव, वडाळा)विभाग : वडाला ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतिक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो – (पहाटे ४.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
  • ‘एफ दक्षिण’ (दादर पूर्व, नायगाव)विभाग : शहर उत्तर – दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता – (सकाळी ७.०० ते १०.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).
  • शहर दक्षिण( परळ, लालबाग) – परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली – (पहाटे ४.०० ते सकाळी ७.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.