मुंबई महापालिकेच्या पिसे-पांजरापूर संकुलातील पांजपापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळेच मुंबईत २४ मे २७ मे दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत ५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. यामार्फत नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
पाणी कपात असल्यामुळे पाणी जपून वापरावे आणि आदल्या दिवशीचा पाणीसाठा कायम ठेवावा असेही महापालिकेने नागरिकांना सांगितले आहे. २४मे मंगळवार ते २७ मे शुक्रवार या कालावधीत दररोज सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत असे ४ तास पाणी कपात करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : बॅडमिंटनची सुरुवात ब्रिटिशांनी महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरात केली होती; आज आपण आहोत चॅम्पियन)
या भागात पाणी कपात
महापालिका विभाग ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, आणि टी या विभागात ५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, फोर्ट, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार आणि कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळक नगर या पूर्व उपनगरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
Join Our WhatsApp Community