पूर्व उपनगरांमधील या भागांमध्ये येत्या बुधवारी आणि गुरुवारी राहणार पूर्णपणे पाणीकपात

169

मुंबई महानगरपालिकेच्या ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी ट्रॉम्बे उच्च स्तरिय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ही दुरुस्ती बुधवारी ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. तर गुरुवारी ९ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित तथा बंद राहील, असे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले.

( हेही वाचा : हेमंत रासनेंसमोर कसबा भाजपचा बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान)

या कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

या भागांमधील पाणी पुरवठा राहणार बंद

एम/पूर्व विभागः

बीट क्रमांक १४० ते १४६ – टाटानगर, गोवंडी स्टेशन मार्ग, देवनार म्युनिसिपल वसाहत (कॉलनी), गोवंडी, लल्लूभाई इमारत, जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्टेशन रोड, सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवी नगर, बी.ए.आर.सी. फॅक्टरी, बी.ए.आर.सी. वसाहत (कॉलनी), गौतम नगर, पांजरापोळ – (०८. फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० ते दि. ०९.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल).

एम/पश्चिम विभागः

बीट क्रमांक १५२ व १५३ – घाटला अमर नगर, मोती बाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत (कॉलनी), लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लाल वाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर – (०८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० ते दि. ०९.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल).

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.