पुण्यात या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे महापालिकेकडून तातडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी गुरुवार दिनांक २६ मे २०२२ रोजी पुणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती जलकेंद्र पंपिंग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी , वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्रावरून केला जाणारा पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर वडगाव जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्र नियमित सुरू राहणार असल्याने सिंहगड रस्ता, कळस-धानोरी तसेच विश्रांतवाडीमधील पाणी पुरवठा नियमित सुरू असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार दिनांक २७ मे २०२२ रोजी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.

( हेही वाचा : भारत सरकारचे ‘हे’ अ‍ॅप वीज पडण्यापूर्वी नागरिकांना करणार सतर्क )

पाणी पुरवठा बंद असलेला परिसर

पर्वती जलकेंद्र, इंदिरानगर पंपिंग, शहरातील सर्व पेठ, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here