पुण्यात ४ जुलैपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा

143

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने अखेर पुणे महापालिका प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ४ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यापूर्वी प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

एक दिवसाआड पाणी पुरवठा

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. पुण्यात व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही, चारही धरणात मिळून केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला तर स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याची तीन दिवसांपूर्वी बैठक होणार होती, पण ही बैठक रद्द झाल्याने निर्णय लांबणीवर पडला होता.

( हेही वाचा : आषाढी वारी २०२२ : विठुरायाचे दर्शन २४ तास सुरू )

शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असला तरी एकूण पाणी वापरता साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पाणी कपात केली जाईल. सध्या पुण्यात रोजचा पाण्याचा वापर १६५० एमएलडी इतका आहे. त्यात ३० टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज सरासरी १२०० एमएलडी पाण्याचा वापर करावा लागेल. सोमवारपासून पुण्यात पाणी कपात लागू होईल, पाऊस लांबणीवर पडल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.