पाणी जपून वापरा! पुण्यात ‘या’ भागातील पाणीपुरवठा ४ जानेवारीला राहणार बंद

जलवाहिनी दुरूस्तीच्या कामामुळे पुण्यात औंध, बाणेरचा पाणीपुरवठा बुधवार ४ जानेवारी रोजी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवार ५ जानेवारीला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : विमान प्रवास करताय? ७२ तास आधी RT-PCR चाचणी अनिवार्य! केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी)

चतु:श्रृंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत चतुःश्रृंगी टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी (४ जानेवारी ) करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी औंध, बाणेरसह अन्य काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी (5 जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यातील ‘या’ भागात येणार नाही पाणी

सकाळ नगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव, बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळा, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाणाचा काही भाग, चव्हाण नगर, पोलीस वसाहत, अभिमान श्री सोसायटी, आंबेडकर चौक ते गोकुळी भोईटे वस्ती पर्यंतचा भाग, राजभवन, भोसले नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here